चाळीसगाव (प्रतिनिधी) बृहन्मुंबई महानगरपालिका व बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम मंडळ { b.e.s.t } अंतर्गत झालेल्या महाराष्ट्र ॲथलेटिक्स स्पर्धेत (शासकीय स्पर्धा) गोळाफेक गटात (10.4) गोळा टाकत चाळीसगावचा भैय्यासाहेब देवरे यांनी नुकत्याच झालेल्या स्टेट लेव्हल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. रोख रक्कम व पारितोषिक स्वीकारत पुढील नॅशनल खेळासाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
बेस्टमध्ये मेंटनस डिपारमेंटमध्ये काम करणारा भैय्यासाहेब देवरे हा मुळ चाळीसगावचा. पण बेस्टमध्ये नोकरी लागल्याने तो तिथं राहतो. खेळाची आवड असल्यामुळे भैय्यासाहेब देवरे ॲथलेटिक्स स्पर्धेत नेहमीच सहभाग असतो. त्याने डेपो अंतर्गत असलेल्या 2018 स्पर्धेमध्ये गोळाफेक या गटातच द्वितीय क्रमांक मिळवला होता. 2018 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती गटात ओपन स्पर्धेत 65 किलो गटात ठाणे जिल्ह्याकडून राज्य लेवल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोना असल्यामुळे स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या.
महाराष्ट्र ॲथलेटिक्स स्पर्धेत (शासकीय स्पर्धा) गोळाफेक गटात 2022 या झालेल्या स्पर्धेत राज्य अंतर्गत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून नॅशनल स्पर्धेसाठी भैय्यासाहेब देवरे यांनी आपले स्थान निश्चित केले आहे. येणारी पुढची मॅच चेन्नई अथवा बेंगलोरला होण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेत त्याला यश मिळो अशी सदिच्छा बेस्ट डेपो धारावी व बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाकडून व्यक्त केली जात आहे. भैय्यासाहेब देवरे हा चाळीसगावातील रहिवासी असलेले मोहन देवरे यांचा मुलगा तर धनगर समाज सेवा संस्था शहराध्यक्ष ऋषिकेश देवरे, आणा देवरे यांचा लहान बंधू व पत्रकार राजेंद्र देवरे यांचे मोठे बंधू आहेत.