भुसावळ (प्रतिनिधी) बसच्या प्रतीक्षेत असलेल्या शहरातील सेवानिवृत्ताचे भामट्यांनी नऊ हजार लांबवल्याची घटना 3 रोजी सकाळी 10 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पंढरीनाथ लक्ष्मण बाविस्कर (77, देना नगर, भुसावळ) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून 3 रोजी सकाळी ते बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत असताना भामट्यांनी त्यांच्या खिशातील नऊ हजारांची रोकड लांबवली. बाविस्कर यांनी याप्रकरणी सोमवारी दुपारी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र भावसार हे करीत आहेत.