जळगाव (प्रतिनिधी) दि. ४ जानेवारीला ऑनलाईन मतदानाने भारतीय बुद्धिबळ महासंघाची निवडणूक पार पडली. भरत सिंग चौहान, संजय कपूर विरुद्ध रवींद्र डोंगरे, आर् राजा गटात जोरदार रश्शीखेच होती. आरोप-प्रत्यारोप, कोर्ट कचेरी, एकमेकांचे निलंबन येथपर्यंत वाद चालू होते. पण या निवडणुकीत भरतसिंग गटाने १२-३ अश्या मोठ्या फरकाने जिंकली. तर डोंगरे/राजा गटाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले.
या निवडणुकीत ३२ राज्यांना प्रत्येकी दोन मतांचा मतांचा अधिकार होता. एकूण ६४ मते होती. एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. १ अध्यक्ष, १ सचिव, १ खजिनदार, ६ उपाध्यक्ष आणि ६ सहसचिव अशी झाली. अध्यक्ष पदासाठी संजय कपूर विरूद्ध पी आर राजा उभे होते. त्यांना ३३ विरूद्ध ३१, सेक्रेटरी पदासाठी भरतसिंग यांनी रवींद्र डोंगरे यांचा ३५ विरूद्ध २९ मतांनी तर खजिनदार साठी नरेश शर्मा यांनी किशोर बांधेकर यांचा ३४ विरूद्ध ३० ने पराभव केला. तर भरतसिग गटाचे उपाध्यक्ष ६ पैकी ५ तर सहसचिव ६ पैकी ४ निवडून आले. त्यामुळे भरतसिंग गटात उत्साहाचे वातावण असून निवडणुकीच्या निकालाने शह काटशह चे राजकारण पर्व संपले असून बुद्धिबळाला खऱ्या अर्थाने चांगले दिवस येतील. असा आशावाद सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे.