भाईंदर (वृत्तसंस्था) पश्चिमेच्या शिवसेना शाखेत शहर प्रमुख पप्पू भिसे (Pappu Bhise) यांना महिला शिवसैनिकांनी मारहाण केलीय. भिसे आणि महिला शिवसैनिक यांच्यात वाद सुरु झाल्याने वैदही परुळेकर (vaidehi Parulekar) यांनी भिसे यांना शाखेतून बाहेर काढून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पप्पू भिसे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पप्पू भिसे हे भाईंदर शिवसेना शहरप्रमुख आहे. रविवारी दुपारी शिवसेनेचा एक पक्षांतर्गत कार्यक्रम होता. त्यावेळी महिला शहर संघटक वैदेही परूळेकर यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर परुळेकर आणि अन्य महिलांनी पप्पू भिसे यांना शाखेच्या बाहेर खेचत बेदम मारहाण केली. या मारहणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात सर्वत्र व्हायरल होत असून, जोरदार चर्चा देखील सुरू आहे. तसेच, या प्रकरणी शहरप्रमुख पप्पू भिसे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे,अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी दिली आहे. तर भिसे यांच्या तक्रारीवरून परुळेकर यांच्याविरोधात मारहणीची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
पक्षांतर्गत नियुक्त्यांवरून हा वाद निर्माण झाला होता. भिसे यांनी शाखेत शिवीगाळ केल्याने शाखेबाहेर नेऊन मारहाण केल्याचे परूळेकर यांनी सांगितले आहे. महिलांनी पप्पू भिसे यांना शाखेच्या बाहेर खेचत बेदम मारहाण केली.पक्षांतर्गत नियुक्त्यांवरून हा वाद निर्माण झाला होता.