चाळीसगाव (प्रतिनिधी) गिरणा काठावरील चाळीसगाव तालुक्यातील प्रमुख गाव असणाऱ्या पिलखोड येथील ७ कोटी ५० लाख रुपये निधीतून साकारण्यात आलेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व माजी पंचायत समिती सभापती आनंदा अण्णा पाटील, माजी सभापती संजय भास्करराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर यांच्यासह पिलखोड गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत व विकासो सदस्य, पिलखोड पंचक्रोशीतील भारतीय जनता पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिलखोड येथे आबालवृद्धांसह महिला भगिनींनी माझे केलेल्या उत्फुर्त स्वागताने आमदार मंगेश चव्हाण हे भारावून गेले होते. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शासनाच्या योजना, विकास कामे शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ हा आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये देता आला हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले.
यावेळी पिलखोड येथील खालील कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले.
1) पिलखोड – तामसवाडी रस्ता सुधारणा करणे – 181 लक्ष
2) पिलखोड पाणीपुरवठा योजना -151 लक्ष
3) पिलखोड ते देशमुखवाडी रस्ता ग्रा.मा.-15 कि.मी.0/00 ते 1/500 ची सुधारणा करणे – 60 लक्ष
4) पिलखोड ते देशमुखवाडी रस्ता सा.क्र.1/500 ते 2/500 रस्ता मजबुतीकरण करणे -35 लक्ष
5) पिलखोड येथे आठवडी बाजारच्या सुविधा व अनुषंगिक कामे करणे – 30 लक्ष
6) पिलखोड येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे – 30 लक्ष
7) पिलखोड येथे शादिखाना बांधकाम करणे – 25 लक्ष
8) पिलखोड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरण करणे. ता. चाळीसगाव जि. जळगाव -10 लक्ष
9) पिलखोड येथे एकलव्य भवन बांधकाम करणे – 20 लक्ष
10) पिलखोड येथे माळी समाज स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे करणे – 20 लक्ष
11) पिलखोड येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे लावणे – 15 लक्ष
12) पिलखोड चौक सुशोभीकरण करणे ता. चाळीसगाव – 15 लक्ष
13) पिलखोड येथे पेव्हर ब्लॉक बसविणे – 10 लक्ष
14) पिलखोड येथे कब्रस्थानास संरक्षण भिंत – 10 लक्ष
15) पिलखोड येथे ज्ञानदीप कॉलनी दोघे गल्लीत रस्ता सुधारणा करणे – 10 लक्ष
16) पिलखोड ता.चाळीसगाव येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे – 10 लक्ष
17) पिलखोड येथे १६ स्टेशन क्रॉसफीट ओपन जिम बसविणे – 7 लक्ष
18) पिलखोड ता.चाळीसगाव येथील अभ्यासिका अद्यावत करणे – 3 लक्ष
19) पिलखोड रविंद्र बाबूलाल पाटील यांच्या घरापासून ते भास्कर नत्थू कोळी यांच्या घरापर्यंत पेवर ब्लॉक बसविणे – 3 लक्ष
20) पिलखोड येथे छत्रपती शिवाजी महाराज सभामंडप बांधकाम करणे. ता चाळीसगाव जि जळगाव – 60 लक्ष
21) पिलखोड येथे गावांतर्गत रस्ते सुधारणा करणे – 20 लक्ष
22) पिलखोड येथे उमेद अंतर्गत असणार्या महिला प्रभाग संघास कार्यालय बांधकाम करणे – 20 लक्ष
23) पिलखोड येथे मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसविणे टप्पा 2 – 5 लक्ष
एकूण – 7 कोटी 50 लाख
यासोबतच दुष्काळी अनुदान अंतर्गत पिलखोड शिवारातील 654 शेतकर्यांच्या खात्त्यात रु. 1,07,12,490 जमा झाले आहेत.