जळगाव (प्रतिनिधी) जलजीवन मिशन अंतगर्त नंदगाव येथे पाण्याच्या टाकीचे माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते आज सकाळी भूमिपूजन करण्यात आले.
साधारण २ हजार लोकवस्तीचे गाव असलेले नंदगाव येथे जलजीवन मिशन अंतगर्त २३ लक्ष रुपये किंमतीची पाण्याची टाकी मंजूर झाली होती. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गावाचे हित लक्षात घेता पाण्याच्या टाकीसाठी प्रशांत कोळी यांनी जागा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रतापराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. तर यावेळी गजानन अशोक बाविस्कर, कृष्णा सोनवणे, सुरेश भिल, ग्रामसेवक आर.एस. महाजन, ठेकेदार अनंत पाटील यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.