TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोसरी भूखंड प्रकरण : तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळेला दोन दिवसांची कोठडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2021
in कोर्ट, गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) भोसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यानंतर तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील अटक करण्यात आली आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

 

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

भोसरी प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांनी भोसरी येथील जमिनीचे बाजारमूल्य हे २३ कोटी रूपये असतांना खडसे यांच्या आप्तांसाठी याचे मूल्य २.७ कोटी रूपये इतके केले. यातून गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. त्यामुळेच रवींद्र मुळे यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रसंगी मुळे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी ते चौकशीत सहकार्य करत असून या प्रकरणातील मुख्य संशयित नसल्याने त्यांना अटक करू नये असा युक्तीवाद केला. मात्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी दिली आहे. या प्रकरणात अजून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याने गेल्या आठवड्यातच खडसे दाम्पत्याला प्रोसेस इश्यू करण्यात आलेले आहेत. यानंतर आता चौकशीसाठी अजून समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भोसरी जमीन गैरव्यवहारात आपला हात नसल्याचा दावा केला असला तरी तेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीने आरोपत्रातून केला होता. या आरोपपत्रात मंदाताई खडसे आणि गिरीश चौधरी यांनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून फायनान्स मिळवला असतांनाच खुद्द एकनाथराव खडसे यांनी आपल्या पत्नीच्या नावे ५० लाख ट्रान्सफर करून यातील ३८ लाख रूपये हे भूखंड खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा संदर्भ घेण्यात आलेला आहे. दुसरीकडे गेल्या वर्षी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणात सर्व संशयितांना प्रोसेस इश्यू करण्यात आले असून ईडीने अजून समन्स बजावण्यासाठी कोर्टाकडून मुदत वाढवून मागितली आहे. दरम्यान, ईडीने दोनदा एकनाथराव खडसे यांची चौकशी केली आहे. तर ५ जुलै रोजी त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीत या प्रकरणात एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे, गिरीश दयाराम चौधरी आणि तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

धक्कादायक : दलित अल्पवयीन प्रेमी युगुलाचं तोंड केलं काळ ; चपलांचा हार घालून गावातही फिरवलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्याच्या ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता ; हवामान विभागाचा अंदाज !

January 30, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2025 !

August 14, 2025

जाणून घ्या..पावसाळ्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का ?

May 5, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : दि. १८ ते २४ फेब्रुवारी २०२४ !

February 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group