जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातअटकेतील संशयित आरोपी महावीर जैन याच्या जामीन अर्जावर मंगळवारी युक्तिवाद पूर्ण झाला. दरम्यान, जैनच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाने जोरदार विरोध केला.
जैन याची बीएचआरमधील नियुक्ती बेकायदेशीर आहे. त्याला गुन्हा संबंधित सर्व माहिती पूर्वीपासूनच होती, मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंडारे याला वाचवण्यासाठी जैन याने बनावट अहवाल तयार केला आहे, त्यामुळे जैन याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला.
दरम्यान, जैन याने जामिनासाठी पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २४ मार्च रोजी जैन याच्या बाजूने वकिलांनी युक्तिवाद केला होता, तर मंगळवारी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद केला.
दरम्या, महावीर जैन, विवेक ठाकरे याच्यासह पाच संशयितांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावातून अटक केली होती. सर्वजणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यातील कमलाकर कोळी या एका संशयितास नंतर न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे, तर इतर सर्वजण अद्याप कारागृहात आहेत.