जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बी.आर.एच. मधे किमान अकराशे कोटी रुपयांची अफरातफर असल्याची आता युध्द पातळीवर चौकशी सुरु आहे. यातील मुख्य सुत्रधार रमेश झंवर व त्याला मदत करणारा सहकार खात्याने नेमलेला प्रशासक कंडारे दोन्ही गेल्या चार दिवसांपासून फरार आहेत. देवेंद्र फडणवीसांचे सरकार असतांना गिरीष महाजन हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पालकांना आपले बालक काय उद्योग करताहेत याची माहिती नव्हती, असा थेट आरोप आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे प्रभारी अनिल गोटे यांनी केला आहे. ‘द क्लिअर न्यूज’ शी बोलताना त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सोशल मीडियात अनिल गोटे यांच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले आहे. याबाबत पत्रावरील क्रमांकावर फोन केला असता श्री. गोटे नामक यांनी वृत्ताला दुजोरा देत म्हणाले की, गिरीश महाजनांच्या चतुरस्त्रेवर अन्याय करणारे ठरेल. याच काळात ग्रामपंचायती पासून नगरपालीका, महानगरपालीका, लोकसभा अगदी विधानसभेपर्यंतच्या निवडणूकांमध्ये पैश्यांचा महापूर धुळेकर जनतेने याची देही याची डोळा पाहीला आहे. पोत्या-पोत्याने येणाऱ्या नोटांच्या निर्मितीचे आता कुठे त्या गोडावून मधील खाद्य कुणाकुणाच्या गव्हाणीत गेले. त्यावर कोण-कोण चरले आता शेण त्याच्या पार्श्वभागातून बाहेर पडले की समजेलच !
गिरीष महाजन यांचे धुळे जिल्ह्यावर आणि जिल्ह्यातील चिकन्यापासून काळविटांपर्यंत भयंकर प्रेम होते. धुळ्यात काही खुट्ट झाले तरी त्यांना झोप लागत नसे. महाजन इतके विरक्त होते की, सरकारी बंगल्यावर विश्रांती घेण्याऐवजी रात्रीच्या रात्री शहरातील गावाबाहेरील बंगल्यावर काढत होते. याच गिरीष महाजन उर्फ मुख्यमंत्र्यांनी सोडलेला सांड, पिस्तुल्या धुळे महापालीकेत निरिक्षक की परिक्षक होता. परिक्षकाने तपासून-तपासून तिकीटे दिली. रात्री पक्षात आल की सकाळी तिकीट ! पालीका निवडणुकीत धुळेकरांनी पैश्यांचा पाहिलेला महापूर विधानसभेपर्यंत उतरलाच नाही मतदान यंत्रे इलेक्ट्रॉनिक असल्याने रिमोट कंट्रोलने चालविणे कठीण नव्हतेच !
राष्ट्रवादीशी फारकत घेवून भाजपाशी मोयतर केलेले गुंडाराज सत्तेत आले. मग काय ? संडासच्या डबड्यांपासून तो रस्त्यावरच्या घाणीवर यांचेच राज्य ! यातूनच नाशिक जळगावच्या वॉटर ग्रेस कंपनीला धुळ्याच्या कचऱ्याचे टेंडर मिळाले. या कंपनीने धुळ्यात बोगस तर, बोगस काम केलेच केले पण नाशिक व जळगाव येथेही आपली बोगसकामाची परंपरा खंडीत होवू दिली नाही. झवरच्या कार्यालयातून दोन ट्रक भरुन कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यात वॉटर ग्रेस कंपनीची अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. गिरीष महाजनांचे कोरे लेटर हेडस्, स्टॅम्प पेपर इत्यादी बराच दारू गोळा हाती लागला आहे.
याच वॉटरग्रेस कंपनीने गेल्या. दोन वर्षात धुळे शहराच्या स्वच्छतेची वाट लावली आहे. त्या चौकशीत वॉटर ग्रेस व धुळे पालीकेतील सत्ताधारी यांचे संबंध कितपत गहन होते याचा खुलासा केला जावा. अशी माझी मागणी मी राज्यशासनाच्या गृहविभागाकडे केली आहे. असे पत्रक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे प्रभारी अनिल गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.