जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील (Jalgaon Bhr Scam) मुख्य संशयित तथा तत्कालीन अवसायक (Liqidator bhr) जितेंद्र कंडारेला (Jitendra Kandare) आज न्यायालयात हजर केले असता त्याची पुन्हा चार दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.
विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांचा पुन्हा जोरदार युक्तीवाद
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेला शिक्रापूर पोलिसांनी २५ डिसेंबरला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने २९ डिसेंबर पर्यंत कंडारेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार आज कंडारे पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. आजही विशेष सरकारी वकील यांनी विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार युक्तिवाद करत बीएचआरमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडलेला आहे. आरोपीने साक्षीदारांना त्रास दिलेला आहे. कटाबाबत काही गोष्टी पोलीस तपासात सांगितलेल्या आहेत. याबाबत अधिक सखोल चौकशी करायची असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने कंडारेला पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. दरम्यान, कंडारेने जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. त्यानुसार न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला होता. परंतू कंडारेची येरवडा कारागृहातून मुक्तता होण्याआधी शिक्रापूरच्या गुन्ह्यात तपासधिकारी पोलीस निरीक्षक सुरज बनगर (Pi Suraj bangar), पोहेका रऊफ शेख यांच्यासह पथकाने त्याला पुन्हा ताब्यात घेतले होते.