जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर पतसंस्थेतील कोट्यावधींच्या घोटाळा प्रकरणात अटक केलेल्या सुरज झंवरची पोलीस कोठडी मिळावी, यासाठी पोलिसांनी न्यायालयात तब्बल १२ कारणे दिली होती. त्यात प्रामुख्याने बीएचआर सॉफ्टवेअर व टेंडर प्रक्रिया एकमेकाला कशी लिंक केली?,कोणाच्या नावे टेंडर फॉर्म स्वहस्ताक्षरात भरले, विविध कर्जप्रकरणे कशी तडजोड केली?, निविदा धारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग कशी करण्यात आली?, यासह एकूण १२ महत्वपूर्ण कारणांचा समावेश आहे.
सुरजच्या पोलीस कोठडीसाठी दिलेली कारणे
१) सुरज झवरने टेंडर भरण्याकरिता वापरलेले लॅपटॉप बाबत त्याच्याकडे चौकशी करून लॅपटॉप जप्त करावयाचा आहे.
२) सुरज झवरने कोणाच्या नावे टेंडर फॉर्म स्वहस्ताक्षरात भरलेले आहे. याबाबत आरोपींकडे चौकशी करून संबंधित त्यांची नावे निष्पन्न करून त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे.
३)सुरज झवर यास बीएचआर सॉफ्टवेअर व टेंडर प्रक्रिया ही त्याच्या ऑफिसमध्ये दिसण्याकरिता पाहिजे आरोपी कुणाल शहाने सदरचे सॉफ्टवेअर सुरज झवरच्या ऑफिसमध्ये इन्स्टॉल केले होते व दोन्ही कार्यालय ऑनलाइन लिंक करण्यात आली होती. अशा प्रकारे इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवेअर बाबत सुरज झवरकडे तपास करणे आहे.
४) पाहिजे आरोपी कुणाल शहा याच्याकडून टेंडरचे कोड सुरज झवरला अगोदरच समजत होते. त्यानंतर सुरज झवर हा सर्वात जास्त रकमेचे टेंडर भरत होता. अशाप्रकारे आरोपीने भरलेले टेंडर बाबत त्याच्याकडे तपास करणे आहे. आरोपीच्या बँक खात्यांची माहिती घेऊन त्यावर झालेल्या व्यवहाराबाबत आरोपीकडे तपास करणे आहे.
५) यापूर्वी सुरज झवर व पाहिजे आरोपी हे नमूद आरोपीच्या ऑफिसमध्ये येत होते. त्यांच्यात झालेल्या मीटिंगमध्ये विविध कर्जप्रकरणे तडजोड करण्यात आली आहेत. अशा प्रकारांबाबत सुरज झवरला संपूर्ण माहिती असून याबाबत तपास करणे आहे.
६) श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी जळगाव यांचे खात्यावरून निविदा धारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरचे टेंडर भरणारे हे सुरज झवरच्या कार्यालयाशी संबंधित किंवा दूरचे नातेवाईक होते. अशा रीतीने आरोपीने लिलावातील मालमत्ता स्वतःच विकत घेण्याचे उद्देशाने आपल्यावतीने इतर व्यक्तींना टेंडर भरायला लावले व टेंडर प्रक्रिया पारदर्शक असल्याचे भासविले आहे. याबाबत आरोपींकडे सखोल तपास करणे आहे.
७) गुन्ह्यातील पाहिजे आरोपीबाबत सुरज झवरला माहिती असून याबाबत त्याच्याकडे तपास करून त्याचे मदतीने पाहिजे आरोपींचा शोध घेणे आहे.
८) सुरज झवरने नमूद पतसंस्थेच्या अपहरातून मिळविलेल्या रक्कमेतून इतर काही स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केली असल्याची दाट शक्यता आहे. याबाबत त्याच्याकडे सखोल तपास करणे आहे.
९) सुरज झवरच्या ऑफिसमध्ये आरोपी जितेंद्र कंडारे, सुनील झवर, महावीर जैन, धरम साखला व इतर आरोपी यांची गुन्ह्याचे संदर्भात मिंटिग झालेल्या असून आरोपींमध्ये झाले गुन्ह्याचे कटाबाबत सुरज झवरला संपूर्ण माहिती असून याबाबत त्याच्याकडे सखोल तपास करणे आहे.
१०) तपासात असे निष्पन्न झाले की, महावीर जैन हा अटक आरोपी व सुनील झवर यांचे कार्यालयात येत होता व बीएचआर च्या कर्ज खात्यांचे खाते उतारे कृणाल शहाने इंस्टॉल करून दिलेल्या सॉफ्टवेअरमधून घेऊन सदरची कर्जखाती सरळ व्याजाने व १२ टक्के व्याजाने हिशोब करुन देत होता. या संदर्भात अटक आरोपींकडे सखोल तपास करणे आहे.
११)सुरज झवर व इतर पाहिजे आरोपी यांच्यातील गुप्त कटात अजून कोण कोणत्या व्यक्ती होत्या याबाबत आरोपींकडे तपास करणे आहे.
१२) नमूद गुन्ह्यात आरोपींच्या ऑफिसमधून मोठ्या प्रमाणावर दस्त ऐवज जप्त करण्यात आलेले असून सदरचे दस्तऐवज सुरज झवर या आरोपी दाखवून त्याबाबत तपास करणे आहे.
सुरज झवरची १२ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर होण्यासाठी पोलिसांनी अशी १२ कारणे न्यायालासमोर दिली होती.