TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बीएचआर’ घोटाळा : आरोपींच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी पोलिसांनी दिली तब्बल २० कारणं !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मधील गैरव्यवहाराशी संबंधित गुन्ह्यातील संशयितांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी दिली तब्बल २० कारणे दिली होती. त्यात प्रामुख्याने संपुर्ण गुप्त कट उघड करणे, आरोपी व्यतिरिक्त अजून कोण या कटात सहभागी आहे का?, त्यांच्या सोबत पैशांचा व्यवहार झाला आहे का?,याचा तपास करणे. पुण्यातील दुकानांचे बनावट व्यवहार कोठे व कसे केले? यासह बनावट वेबसाईट, सॉफ्टवेअर यासंबंधी चौकशी करण्यासह आदी कारणाचा समावेश आहे.

१. सदर गुन्हयाचा गुप्त कटामध्ये आरोपी धरम साकला, विवेक ठाकरे, महावीर जैन, सुजित वाणी व इतर पाहीजे आरोपीतांनी बजावलेली भुमिका व गुप्त कट अमलात आणण्याची विशिष्ट शैली व या गुप्त कटात अजुन कोणकोणत्या व्यक्ती सहभागी आहेत, हे जाणून घ्यावयाचे आहे व संपुर्ण गुप्त कट उघड करावयाचा आहे.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

२. आरोपी जितेंद्र कंडारे हा अवसायक म्हणून संचालकाच्या जागेवर नियुक्त झाला होता. त्याची नियुक्ती ही संस्थेतील मालमत्ता पारदर्शीपणे शासकीय वेवसाईब्दारे विशी तसेच कर्जदारांची मालमत्ता विक्री करून तसेच संस्थेकडे इतर येणे असलेला पैसा वसूल करून आलेला पैसा सम प्रमाणात गुंतवणूकदार/ठेवीदारांना पाटप करावयाचा असतो परंतू आरोपी धरम साकला. विवेक ठाकरे, महावीर जैन, सुजित वाणी यांनी य मिळुण न आलेले आरोपी सुनिल झंवर, जितेंद्र कंडारे यांनी आरोपी कुणाल शहा या अहमदाबादच्या व्यक्तीशी कुठे कशी व कोणामार्फत भेट केली ? त्याचेशी संगणमत करून बनावट वेबसाईट तयार केली तसेच या बनावट वेबसाईटव्दारे कोणकोणत्या संस्थेच्या मालमत्ता विक्री करावयाचे भासवायचे याबाबत कोठे वैठका झाल्या व त्यात या आरोपी व्यतिरिक्त अजून कोण सहभागी होते हे आरोपी धरम साकला, विवेक ठाकरे, महावीर जैन, सुजित वाणी यांच्याकडे सखोल तपास करून जाणून घ्यावयाचे आहे.

 

३. बनावट वेबसाईडब्दारे संस्थेच्या कोणकोणत्या मालमत्ताचा विक्रीच्या नावाखाली अपहार केला व कोणकोणत्या व्यक्तीला त्या विक्री केल्याचे भासवण्यात आले त्या व्यक्तींची नावे तसेच त्या मालमत्ता खरेदीसाठी कोणकोणत्या एजंटांनी ठेवीदारांच्या पावत्या खरेदी केल्या व त्याबाबतची नोटराईज् कागदपत्रे कोटे द कोणी तयार केली हे सखोल तपास करून जाणून घ्यावयाचे आहे.

 

४. बनावट वेबसाईडव्दारे संस्थेच्या मालमत्ता विक्री केल्याचे भासवण्यासाठी जी कागदपत्रे तथाकथित खरेदी दारांनी कोठे व कोणी तयार केली त्यासाठीची अनातम रक्कम कोणी भरली तसेच निविदा कमीटी स्थापन करण्यात आली होती काय ? व त्यात कोण व्यक्ती होत्या हे सखोल तपास करून जाणून घ्यावयाचे आहे. अथया इतर काही मालमत्ता लपवून ठेवली आहेत काय ? याबाबत जळगाव येथे आरोपींसह जावून सखोल तपास करावयाचा आहे.

 

५. शासकीय वेबसाइट असताना या बनावट वेबसाइट तयार करण्याची कल्पना कोणी कोठे दिली? व त्याबाबत सकट कुठे रस्ता गेला?, त्यात कोणकोणत्या व्यक्ती समाविष्ट होते हे चौकशी करून जाणून घ्यायचे आहे.

 

६. महाविर जैन मार्फत तयार करण्यात आलेल्या बनावट अहवाल तयार करण्याची कल्पना कोणी दिली? व त्यात कोणकोणत्या व्यक्ती समाविष्ट आहेत, हे जाणून घ्यावयाचे आहे. तसेच आरोपी धरम साखला, विवेक ठाकरे, महाविर जैन, सुजित वाणी व इतरांची नेमकी काय भूमिका आहे?, हे जाणून घ्यायचे आहे.

 

७. आरोपी सुनील झंवर व त्यांच्या संस्थांची नावे बेकायदेशीर संस्थेची मालमत्ता विक्री केल्याचे दाखवून कोणकोणत्या एजंटांमार्फत ठेवीदारांच्या पावत्या ३० टक्क्याने विकत घेतल्या याबाबत जाणून घ्यायचे असून यात आरोपी धरम साखला, विवेक ठाकरे, महाविर जैन, सुजित वाणी यांनी बजावलेली भूमिका जाणून घ्यावयाचे आहे. या ठेवीच्या पावत्या व त्यासंदर्भातील शपथपत्रे जप्त करावयाची आहेत. तसेच ही ३० टक्के रक्कम ठेवीदाराला कशी परत करण्यात आली? या संस्थेच्या रेकॉर्डला सुजित वाणीने कशाप्रकारे खोट्या नोंदी केल्या व बीएचआर संस्थेच्या रेकॉर्डला आरोपी धरम साखला, विवेक ठाकरे, महाविर जैन, सुजित वाणी, यांची भूमिका काय? हे सखोल तपास करून जाणून घ्यावयाचे आहेत.

 

८. आरोपी धरम साखला, महाविर जैन, यांच्याकडून बनावट वेबसाईटद्वारे मालमत्ता विक्री केल्याचे दाखवले याबाबतचे कागदपत्र जप्त करावयाची आहेत. त्या कागदपत्रांत बाबत अटक आरोपींकडे सखोल चौकशी करायची आहे.

 

९.आरोपी धर्म कला व इतर आरोपींनी जळगाव येथे येऊन जाऊन घेऊन जाऊन त्यांच्याकडून बनावट वेबसाइट दारे मालमत्ता विक्री केल्याची की बनावट कागदपत्रे जप्त करावयाची आहे.

 

१०. यातील मिळून न आलेले आरोपी जितेंद्र कंडारे च्या घर झडतीमध्ये मिळून आलेली रोख रक्कम ९ लाख ७८ हजार रुपये. तसेच २१ लाख ५२ हजार ८४० या रकमेचे सोन्याचे दागिने, 3,34,196 या रकमेचे चांदीच्या विटा, असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याबाबत आरोपी धरम साखला, विवेक ठाकरे, महाविर जैन, सुजित वाणी यांच्याकडे सखोल तपास करायचा आहे. त्याबाबत करण्यात आलेल्या तपासात सहकार्य करीत नाही.

 

११. यातील मिळून आलेले आरोपी सुनील झंवरकडे शासनाच्या वेगवेगळ्या गॅझेटेड अधिकाऱ्यांचे अनेक बनावट शिक्के मिळून आले आहेत. (शंभराच्यावर) सदरचे संघटित गुन्हेगारकडे या शिक्क्यांबाबत विचारपूस करायची आहे.

१२. अटक आरोपी धरम साखला, विवेक ठाकरे, महाविर जैन, सुजित वाणी व मिळून न आलेले आरोपी जितेंद्र कंडारे, कुणाल शहा, सुनील चव्हाण, योगेश साखला, प्रकाश वाणी व इतरांनी संस्थेची मालमत्ता बनावट वेबसाइटवरून विक्री केल्याचे भासवले. यात त्यांचा हिस्सा कसा व किती आहे व कशाप्रकारे आहे?, हे जाणून घ्यायचे आहे.

१३.बनावट वेबसाईट द्वारे विक्री केल्याचे दाखविण्यात आलेल्या संस्थेच्या मालमत्तेच्या मोबदल्यासाठी अनेक ठेवीदारांच्या मुदत ठेवीच्या पावत्या वापरण्यात आलेल्या आहेत. त्या ठेवीदारांची नावे अटक आरोपींकडून जाणून घ्यायची आहे.तसेच त्या पावत्यांचे शपथपत्र आरोपींकडून जप्त करायचे आहे.

 

१४. तपासात मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे मिळून आले असून ती जप्त करण्याची कारवाई चालू आहे. यातील नमूद आरोपींना जळगाव येथे घेऊन जाऊन नमूद कागदपत्र व्यतिरिक्त इतर काही कागदपत्रे अथवा इतर काही मालमत्ता लपून ठेवले आहेत का? याबाबत जळगाव येथे आरोपींसह जाऊन सखोल तपास करावयाचा आहे.

 

१५. बीएचआर संस्थेत अवसायकाच्या नेमणूकीनंतर नविन सॉफ्टवेअर तयार केल्याचे आरोपी सुजित वाणी ऊर्फ बावीसकर तपासात सांगत आहे. तसेच सदर सॉफ्टवेअरमध्ये पाहिजे तश्या नोंदी करता येतात. परंतू ते कोणाकडून तयार करून घेतले?, याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

१६. आरोपीचे कोण-कोणत्या बँकेत बँक खाती उघडली आहेत. व त्या करीता त्याने कोणत्या कागदपत्रांचा उपयोग केला आहे?, या बाबत माहिती घेवून तपास करणे आहे.

१७. आरोपींच्या कार्यालयाची व राहते घरांची घरझडती घेवून गुन्हयाचे अनुषंगाने मिळून येणारी कागदपत्र व कॉम्पुटर/लैपटॉप व अजून महत्वाचा दस्तएवज गुन्हयाचे पुरायेकामी जप्त करणेथी कारवाइ चालू आहे.

 

१८.आरोपीने स्वतःचे बँक खात्यातून गुंतवणूकदार/ साक्षीदार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाला रक्कम आरटीजीएसद्वारे अथवा चेकद्वारे दिल्या आहेत काय?, त्या संबधीत लोकांकडे तपास करुन त्यांचा गुन्हयात कितपत सहभाग आहे? या पुढील कार्यवाही करणे आहे.

 

१९. आरोपींचे इतर कोणी सहकारी आहेत काय या बाबत तपास करुन त्यांचाही शोध घेवून त्यांना अटक करणे आहे.

२०. पुणे येथील बालगंधर्व चौकातील घोले रोड येथे सदर संस्थेची ५ दुकाने व फ्लॅट जवळपास ३ कोटी ११ लाखाला विक्री केल्याचे भासविले आहे. परंतु या मालमत्तेचा मोबदला ठेवीदारांच्या पावत्या जवळपास १ कोटी ६० लाखच्या जमा केल्याच्या खोटया नोंदी करण्यात आल्या आहेत. तसेच ही रक्कम ठेदीदारांना दिल्याच्या खोटी नोंदी करण्यात आल्या आहेत. सदरची ५ दुकाने व फ्लॅट हे अत्यंत मोक्याचे जागी असून येथे एका फ्लॅट किंमतच जवळपास २.५ ते ३ कोटी रूपये एवढी आहे. यावरून आरोपींनी योजनाबध्द रितीने हा बनावट व्यवहार कोठे व कसा केल्याचे दर्शविले याबाबतची कागदपत्रे जप्त करावयाची आहेत. या संपुर्ण बनावट व्यवहाराची माहिती अटक आरोपी यांना विचारपूस केली असता माहित असल्याचे सांगतात. तसेच वेळोवेळी वेगवेगळी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्याबाबत आरोपींकडे सखोल तपास करणे आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार : अदर पुनावाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ सराफ बाजारात महिलेच्या पर्समधून लांबविले सोन्याचे दागिने !

February 14, 2022

युवकांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

September 14, 2024

शासकीय कामात अडथळा अन् विनयभंग ; मुक्ताईनगरात परस्पर विरोधी तक्रारी !

October 9, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 सप्टेंबर 2025 !

September 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group