जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी संशयित आरोपी विवेक ठाकरेची प्रकृती दोन दिवसापासून बिघडली असून येरवडा कारागृह रुग्णालयात मागील दोन दिवसापासून उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने आपल्या वकिलांना दिली. त्यानुसार आज जामीन अर्जावर झालेल्या सुनवाईत अॅड. उमेश रघुवंशी यांनी ठाकरेंना हृदयविकार तसेच रक्तदाबाचा त्रास असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले.
दोन दिवसापूर्वी येरवडा कारागृहात विवेक ठाकरे यांना भेटायला त्यांची पत्नी गेल्या होत्या. त्यावेळी ठाकरे यांनी आपल्या पत्नीला सांगितले की, मागील दोन दिवसापासून छातीत दुखत आहे. त्यामुळे येरवडा कारागृह रुग्णालयात मागील दोन दिवसापासून उपचार घेत आहे. दरम्यान, आज कोर्टात सुनावणीच्या वेळी भेट झाल्यानंतर ठाकरे यांच्या पत्नीने आपले वकील अॅड. उमेश रघुवंशी यांना माहिती दिली. त्यानुसार त्यानुसार आज जामीन अर्जावर झालेल्या सुनवाईत अॅड. उमेश रघुवंशी यांनी ठाकरेंना हृदयविकार तसेच रक्तदाबाचा त्रास असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. तसेच न्यायालयाने याबाबत कारागृहाकडून माहिती मागविण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.