TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : झंवरने पाळधीच्या साईबाबा मंदिरासाठी फ्लोवर क्लीनिंग मशीन घेण्यातही केला झोल !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरने ठेवीदारांच्या फसवणूकी सोबत पाळधीच्या साईबाबा मंदिरासाठी फ्लोवर क्लीनिंग मशीन घेण्यातही मुदत ठेवी बेकायदेशीररित्या वर्ग करण्याचा झोल केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. तसेच लिलावा पूर्वीच टेंडरचे कोड मिळवणे,गुन्ह्याची विशिष्ट शैली वापरून अपहारासह इतर गंभीर गोष्टी देखील पोलीस तपासात समोर आल्या आहेत.

सुनील झंवर हा पाळधी येथील श्री साई सेवा समिती चारीटेबल ट्रस्ट, श्री साई मंदिरचा सेक्रेटरी आहे.झंवरने श्री साई सेवा समिती चारीटेबल ट्रस्ट, श्री साई मंदिर, पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव यांचे नावे रू. १,५१,०००/- या रकमेची खरेदी केलेल्या फ्लोवर क्लीनिंग मशीन खरेदी करण्यासाठी रुपये १,०५,७००/- या रक्कमेच्या मुदत ठेवी बेकायदेशीररित्या वर्ग केल्या आहेत. सदरचा टेंडर फॉर्म आरोपी सुरज झंवर याने स्वहस्ताक्षरात लिहिलेला असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

झंवर लिलावा पूर्वीच टेंडरचे कोड मिळवायचा

पूर्वनियोजित कटा नुसार सुनील झंवरने इतर आरोपींच्या संगनमताने आपले कार्यालयात संशयित आरोपी कुणाल शहा याच्या मदतीने बीएचआर संस्थेचे कामकाज ज्या सॉफ्टवेअर मधून केले जात होते, ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेतले होते. यामध्ये स्वतःचे व बीएचआर असे दोन्ही कार्यालयाची ऑनलाइन लिंक जोडण्यात आली होती. सुनील झंवर हा संशयित आरोपी कुणाल शहाकडून लिलावा पूर्वीच टेंडरचे कोड मिळवत होता. व त्यामुळेच झंवरने सर्वात जास्त रकमेचे टेंडर भरलेले आहेत. बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीचा सर्व तपशील हा केवळ बीएचआर कार्यालयातच उपलब्ध होणे आवश्यक असताना तो सुनील झंवर व सुरज झंवर यांच्या कार्यालयातून जप्त केलेल्या हार्ड डिक्समध्ये मिळून आलेला आहे.

ठेवीदारांच्या पैशांची योजनाबद्ध व सुनियोजित पद्धतीने गुन्ह्याची विशिष्ट शैली वापरून अपहार

गुन्ह्याचे कटामध्ये सुनील झंवरने प्रत्यक्ष सहभाग घेतला असून आपले कार्यालय इतर संशयित आरोपी बरोबर झालेल्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे संगनमताने इतर संशयित आरोपींमार्फत ठेवीच्या पावत्या गोळा करून ठेवीदारांना त्याचे मुदत ठेवी पावत्यांचे २० ते ३५ टक्के रक्कम देण्याचे आमिष दाखविले आहे. काही तथाकथित कर्जदारांकडून २० ते ३५ रक्कम ठेवीदारांना परस्पर देऊन त्यांच्या ठेवीची संपूर्ण १०० टक्के रक्कम कर्ज धारकाला बेकायदेशीरपणे वर्ग करून, ठेवीदारांना १०० टक्के रक्कम परत केल्याचा व कर्जदाराने १०० टक्के रक्कम भरणा केल्याच्या खोट्या नोंदी संगनमत करून घेऊन ठेवीदारांच्या पैशाचा योजनाबद्ध रीतीने व सुनियोजित पद्धतीने एक विचाराने गुन्ह्याची विशिष्ट शैली वापरून अपहार केला आहे.

अपहाराच्या संदर्भातील कागदपत्रे खान्देश मिल कार्यालयात

सदरचा अपहार बीएचआर कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांना कळू नये म्हणून सुनील झंवर व त्याचा मुलगा आरोपी सुरज झंवरने गैरव्यवहार, अपहाराच्या संदर्भातील कागदपत्रे आपल्या खान्देश मिल येथील कार्यालयात तयार करून घेतली आहेत.

केवळ मराठी वृत्तपत्रात जाहिरात
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, महाराष्ट्रात संपूर्ण राज्यात प्रसारित होणारे मराठी व इंग्रजी वृत्तपत्रात मालमत्ता विक्रीची जाहिरात देणे आवश्यक असताना केवळ मराठी वृत्तपत्रात जाहिरात दिल्याचे दाखविले गेले. तसेच सदरची जाहिराती ही बीएचआर पतसंस्थेचे कार्यालयांमध्ये तयार करणे आवश्यक असताना ती प्रत्यक्षात सुनील झंवरच्या कार्यालयात तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मालमत्ता विक्रीचा तपशील झंवरच्या कार्यालयातून जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये आढळला

पोलीस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, बीएचआर संस्थेच्या मालमत्ता विक्रीचा सर्व तपशील हा केवळ बीएचआर कार्यालयातच उपलब्ध होणे आवश्यक होता. परंतू तो कारण नसताना सुनील झंवर व सुरज झंवर यांच्या कार्यालयातून जप्त केलेल्या हार्ड डिस्कमध्ये मिळून आला आहे. त्यामुळे नमूद गुन्हा अत्यंत गंभीर असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार व गैरव्यवहार संगनमताने व पूर्वनियोजित कट रचून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : झंवरच्या पोलीस कोठडीसाठी पोलिसांनी मांडले १० मुद्दे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ? : बच्चू कडू

December 30, 2020

एमआयडीसीतील हॉटेलमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 22, 2025

ग्रामपंचायत निवडणुक : जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यातील तालुकानिहाय गावांची संख्या !

November 10, 2022

धरणगाव : हवेत गोळीबार करणाऱ्या संशयिताला एलसीबीकडून अटक; गावठी पिस्तूल केला जप्त !

October 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group