जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील भुसावळ येथील मुख्य शाखा असलेल्या स्टेट बँकेत आज सात कर्मचारी सशंयित कोरोना बाधित आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे .खबरदारी घेण्यासाठी आज सकाळ पासुन बँकेचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते . याबाबतची सविस्तर माहिती देण्यास शाखा व्यवस्थापकांनी नकार दिला आहे. बँकेत येणाऱ्या खातेदारांना व्यवहाराविना परतावे लागले. कोरोना बाधित संशयित कर्मचाऱ्यांना तपासणी साठी पाठविण्यात आले असुन त्यांचा अहवाल आल्यानंतरच सर्व स्पष्ट होणार आहे. बँकेचे व्यवहार कधी सुरू होतील हे समजु शकले नाही.
जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधिताची संख्या वाढत आहे. 13 सप्टेंबर रोजी रात्री पर्यंत 38 हजार 836 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे . तर आतापर्यंत हजार 971 रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे .तर 27 हजार 749 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे . प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात असले तरी देखील नागरिक शहरात गर्दी करीत असून विना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे.