भुसावळ (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा निघृण खून केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी करण पथरोड याला नाशिकमधील द्वारका परिसरातून नाशिक शहर पोलिसांच्या गुंड विरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतूसे ही हस्तगत केले आहेत.
द्वारका येथे सापळा रचून पकडले !
भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला असल्याची माहिती नाशिक शहरात भद्रकाली पोलीस ठाणे हद्यीत गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी द्वारका येथे पथकासह सापळा लावला. संशयित हा द्वारका येथील बोहरी पेट्रोलपंपाजवळ थांबलेला असल्याचे दिसून आले. तर तो पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करुन शिताफीने त्यास ताब्यात घेतले. संशयित आरोपी करण किसन पथरोड (वय २०, रा. ७२ खोली, वाल्मीक नगर, भुसावळ) याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली २ देशी पिस्टल व ५ काडतुसे असा एकुण ८४ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन त्याला पुढील तपासकामी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई नाशिक शहरचे पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनात गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, डी. के. पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, राजेश सावकार, सुनील आडके, नितीन गौतम, गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या केली.
आतापर्यंत ‘या’ संशयितांना अटक !
गोळीबार करून संतोष बारसे यांच्यासह सुनील राखुंडे यांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी शिव पथरोड, विनोद चावरीया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करन पथरोड, नितीन पथरोड यांना ताब्यात घेतले आहे. तर अजून तीन ते चार जणांना या प्रकरणात अटक होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
भुसावळ शहरात कडेकोट बंदोबस्त !
भुसावळ शहरात कायदा, सुव्यवस्थेची स्थिती उद्भवू नये, यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी लक्ष ठेवून होते. शहरातील वाल्मीक नगरासह सर्वच भागात जिल्ह्यावरून आलेल्या वाढीव कुमकचा बंदोबस्त तैनात करण्यात आला