भुसावळ (प्रतिनिधी) चाकुचा धाक दाखवून शहरातील नाहाटा चौफुली कडे पायी जात असलेल्या तरुणास चोरट्यांनी एमआय कंपनीचा मोबाईल व रोख पैसे लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत आरोपीस अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सागर सुभाष बारगळ (वय-26 रा.मुंडवाडी ता.कन्नड जिल्हा औरंगाबाद) हे आपल्या गावी जाण्यासाठी दिनांक.21.12.2019 रोजी पहाटे 5.30 भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली कडे पायी जात असताना तीन अज्ञात इसमानी फिर्यादी जवळील 6,000 रु किंमतीचा Mi कंपनी चा मोबाईल तसेच 1700 रु रोख असे मारहाण करून चाकु चा धाक दाखवून फिर्यादी स जामनेर रोड हॉटेल हेवनचे बाजुच्या गल्ली त नेऊन जबरी ने हिसकावून घेतले होते. भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. भाग 5 गुरनं 0579/2019 भा.द.वि. कलम-394,323,504,506,34 प्रमाणे दि. 21.12.2019 रोजी 15.17 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील 11 महिन्या पासून फरार आरोपी नामे लुकमान उर्फ लुक्का कादर शहा वय-26,रा.दीनदयाल नगर, भुसावळ हा भुसावळ शहरात आल्याची मा. पोलीस निरीक्षक श्री.दिलीप भागवत सो याना मिळलेल्या गुप्त बातमी वरून आरोपी म यास भुसावळ शहरातून जामनेर रोड वरील प्रीमिअर हॉटेल समोरून सापडा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंडे सो,जळगाव जिल्हा व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहा.पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, भुसावळ व जळगाव विभाग व मा पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे, मंगेश गोटला, पो.ना.किशोर महाजन, उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, सुभाष साबळे अशांनी केली आहे.