भुसावळ (प्रतिनिधी) हाथरस येथील बलात्कार आणि हत्येचा भुसावळ तालुका वकिल संघातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.
माणूसकीला काळीमा फासणा-या उत्तर प्रदेशातील हाथरस योपिल बलात्कार आणि हत्याकांडाचा भुसावळ वकिल संघातर्फ निषेध दि.14/09/2020 रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा भुसावळ वकिल संघाकडून तीव्र निषेद नोंदविण्यात आला आहे. दुर्धटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या पिढीत परिवाराची हेळसांड आणि मिडीयाची मुस्कटदाबी या सारख्या अक्षम्य अपराधाचा भुसावळ वकिलसंघ तीव्र निषेद करत आहे. संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणा-या सरकारचा निषेद. सत्य जनते समोर येवू नये म्हणुन लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या मिडीयाला रोखणा या असंवेदशिल सरकारचा निषेद करण्यात आलाय. रातोरात निर्णयाचा अतिम संस्कार करून गुन्हेगारांना अभय देणा-या सरकारचा निषेद, कथित प्रकरणाची सीबीआय चौकशी होवून सदरचा खटला आरोपींविरूढ प्रदेश सोडून देशाच्या अन्य न्यायालयात चालविण्यात यावा. पिढीत परिवाराला संरक्षण देण्याची मागणी भुसावत वकिल संघ करत आहे. निर्दयी आरोपी विरूध्द साटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून दोघांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भुसावळ वकिल संघ करत आहे. महिला वर्गाची हेळसांड रोखण्यात अयशस्वी झालेल्या सरकारचा निषेध करण्यात आला आहे.