भुसावळ (प्रतिनिधी) येथील रहिवाशी टीटीई एल.टी.टी.तुलसी एक्सप्रेसमध्ये ड्युटी करीत असतांना नाशिकरोड ते इगतपुरी दरम्यानचे वेटिंग तिकीट प्रवाशांना दरवाजापासून दूर बसण्यास सांगण्याचा राग आल्याने एका प्रवाशाने तुलसी एक्सप्रेसमध्ये मारहाण केल्याची घटना घडली.
यासंदर्भात अधिक असे की, दिनांक २६ मे २०२२ रोजी ट्रेन 22130 PRYJ -LTT तुलसी एक्सप्रेसचे कोच B-1 मध्ये नाशिकरोड ते इगतपुरी दरम्यानचे वेटिंग तिकीट काढून दरवाज्याजवळ बसलेले प्रवाशांना ट्रेनचे TTE नरेंद्र दिगंबर बाविस्कर (वय ३६ वर्षे) मुख्यालय भुसावळ ते एल.टी.टी.या मार्गावरून वेटिंग तिकीट प्रवाशांना दूर बसण्यास सांगितले. प्रवाशांला राग आल्याने टीटीई सोबत भांडण व मारहाण केली. तसेच प्रवाशी मोहम्मद रशीद अक्रम शेख (वय १८) याने टीटीईच्या डोक्यात एखाद्या वस्तूने मारहाण केल्याने रक्तस्त्राव झाला. टीटीईने संदेश दिल्यानंतर इगतपुरी येथे आरपीएफ आणि जीआरपीने ट्रेनमध्ये हजेरी लावली. भांडण करणारे प्रवासी व टीटीई यांना गाडीतून उतरवण्यात आले. तसेच नाशिकरोडला सर्व प्रवाशांना जीआरपी पोलिस स्टेशन नाशिकरोड येथे आणण्यात आले. या प्रकरणाचा तपास जीआरपी नाशिकरोडकडून सुरू आहे.
















