TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : गोजोर्‍यातील धाडसी चोरीचा उलगडा ; अट्टल चोरट्यांना अटक !

आरोपींकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता : पोलीस अधीक्षक एम.राजकुमार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील गोजोरा येथे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी साधारण १२ लाख रुपये किंमतीचे सुमारे १९५ ग्रॅम वजनाचे दागिणे लंपास केले होते. या घरफोडीबाबत कुठलाही पुरावा नसताना भुसावळ तालुका पोलिसांनी शिताफीने गुन्ह्याची उकल करीत चार चोरांना अटक केली आहे. शिवाय आरोपींच्या अटकेनंतर अनेक गुन्हे उघडकीस येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी येथे दिली.

नेमकं काय घडलं ?
मालतीबाई अभिमान चौधरी (57) या सेवानिवृत्त पती व विधवा मुलगीसह गोजोरा, ता.भुसावळ येथे वास्तव्यास आहेत. चौधरी कुटूंब पुणेस्थित मुलाला मुलगी झाल्यानंतर पाहण्यासाठी गेल्यानंतर 26 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. 7 रोजी नातेवाईकांनी घर उघडे असल्याचे माहिती चौधरी कुटूंबियांना दिल्यानंतर त्यांनी खातरजमा केली असता घरफोडी झाल्याचे उघडकीस आले होते. चोरट्यांनी सहा लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचे 195 ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिणे लांबवल्याने याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

सीसीटीव्हीत गवसले संशयित !
पोलीस पथकाने घटनास्थळावरून आरोपींचे फिंगर प्रिंट घेतले तसेच सीसीटीव्हीद्वारे शोध घेतल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12.40 तीन संशयित दुचाकीवरून येताना दिसल्यानंतर संशयित नशिराबादमार्गाने आल्याचे व त्याच मार्गाने गेल्याचे स्पष्ट झाले. संशयितांची ओळख पटवण्याकामी यंत्रणा अहोरात्र परीश्रम घेत असतानाच 12 रोजी पहाटे दोन वाजता गोजोरा गावातच तीन अज्ञात संशयित पुन्हा दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती यंत्रणेला मिळताच त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बोलते केले असता त्यांनी यापूर्वी गोजोरा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.

आरोपींना अखेर बेड्या !
पोलिसांनी रवी प्रकाश चव्हाण (18, शबरीनगर, तांबापुरा, जळगाव), जुनैद उर्फ मुस्तकीनशहा भिकन शहा (22, तांबापुरा, मच्छीमार्केट, जळगाव) व विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी गोजोरा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. रवी चव्हाण विरोधात पोलिसात तीन तर रामानंद पोलिसात दोन गुन्हे तसेच जुनेदविरोधात जिल्हापेठ पोलिसात एक गुन्हा दाखल आहे. आरोपी रवी चव्हाणचा साथीदार गुरुदयाल मनजीतसिंग टाक (जळगाव) याने बारडोली, गुजरात येथे सराफा व्यावसायीक कन्हैय्यालाल मणिलाल सोनी (43, पटेलनगर, गुजरात बारडोली) यास विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर सराफाकडून 154 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले तर आरोपींनी सराफाकडून मिळालेल्या सहा लाख 40 हजारांपैकी आरोपी रवीने दोन लाख 40 हजार स्वतःजवळ, जुनेदला एक लाख, अल्पवयीनास दोन लाख तसेच गुरुदयाल टाक यास एक लाख दिल्याची कबुली.

पोलीस अधीक्षकांनी केले पथकाचे कौतुक !
पत्रकार परीषदेत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह तपास पथकाचे कौतुक केले तसेच पथकाला आयजी रीवॉर्डसाठी शिफारस केल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अटकेतील आरोपींकडून एक लाख 92 हजार 500 रुपयांची रोकड, सात लाख 32 हजार 530 रुपये किंमतीचे 154 ग्रॅम वजनाचे सोने, चार हजार रुपये किंमतीचे चांदी, दिड लाख रुपये किंमतीच्या दुचाकी असा एकूण 10 लाख 94 हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

यांनी उघडकीस आणली घरफोडी !
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक सतीश कुलकर्णी, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, हवालदार संजय तायडे, हवालदार युनूस शेख, हवालदार दीपक जाधव, हवालदार प्रेमचंद सपकाळे, हवालदार धीरज मंडलिक, चालक हवालदार सादीक शेख, हवालदार राजू काझी, हवालदार उमाकांत पाटील, बाजारपेठचे कॉन्स्टेबल जगदीश भोई, कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण आदींच्या पथकाने केली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
Next Post

पूर्णा पात्रातील सहा लाखांची वाळू चोरी ; अज्ञाताविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, भाजपचे २ मोठे नेते आज शिवबंधन बांधणार

January 8, 2021

सावदा शहरात पुन्हा चोरी ः दिवसाढवळ्या 20 हजारांची रोकड लांबवली

December 3, 2024

‘ज्याचं अक्षर सुंदर, त्याचे विचार सुंदर : पंकज नागपुरे

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group