जळगाव (प्रतिनिधी) एका २७ वर्षीय विवाहित तरूणाने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खेडी बु येथे घडली आहे.
या संदर्भात अधिक असे की, निकेश जयसिंग पाटील हे आपल्या पत्नी मीनासह खेडू खुर्द येथे भाड्याच्या घरात राहतात. शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास निकेशने आपल्या राहत्या घरात छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. गळफास घेतलेल्या अवस्थेत पतीचा मृतदेह बघताच पत्नीने आरडाओरडा केला. यावेळी शेजारच्यांनी तात्काळ त्यांच्या घराकडे धाव घेत निकेशला खाली उतरवले. त्यानंतर उपचारासाठी देवकर कॉंलेज मधील शासकीय वैद्यकीय आयुर्वेद रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतू याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी त्याची तपासणीअंती निकेशला मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पुढील तपास पो.ना.महेंद्र गायकवाड, पो.कॉं. शांताराम पाटील हे करीत आहे.