TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
May 15, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : डीडबल्यूजे असो. प्रा. लि. कंपनीत गुंतवणुक केल्यास जास्तीत जास्त दरमहा परतावा देण्याचे अमिष दाखवित तसेच नियमबाह्य स्कीम राबवून आणि सेबीच्या नियमांचे उल्लंघन करीत २७९ गुंतवणूकदारांकडून ११ महिन्यांच्या मुदतीकरीता २३ कोटी ८१ लाख ७२ हजार रुपयांची गुंतवणुक केली. तसेच त्याचा परतावा न देता अपहार केल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्य संचालकांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीचे एजंट मिलींद शालीकराव पाटील (वय ४१, रा. शिवकॉलनी) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

टीडबल्यूजे असो. प्रा.लि. पुणे या कंपनीच्या एजंटने संचालकांविरुद्ध गुंतवणुकदारांची गुंतवणूक स्विकारुन मुदतीत परतावा दिला नसल्याचा तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखेने सखोल चौकशी केली. या चौकशीत अर्जदार मिलींद पाटील हा कंपनीच्या फर्मची फ्रेंचायसी नात्याने सर्व कामकाज तो पाहत होता. तसेच गुंतवणुकदारांकडून गुंतवणुका स्विकारुन त्यांना करारनामे देखील करुन देत होता. त्यापोटी त्याला मोठ्या प्रमाणात कमीशन प्राप्त झाले होते. या संपुर्ण प्रकारावरुन अर्जदार मिलींद पाटील याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्याचा तपास आर्थीक गुन्हे शाखेचे प्र. पोलीस उपअधीक्षक पोनि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश फड, पोहेकॉ रविंद्र परदेशी, पोकों विकास पहुरकर हे करीत आहे.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

गुंतवणुकीवर अधिकचा परताव्याचे दाखविले अमिष

टीडबल्यूजे असो. प्रा.लि.चे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, टीडबल्यूजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा. लि.चे संचालक संकेश रामकृष्ण घाग व एजंट मिलींद पाटील यांच्यासह इतर संचालक व एजंट यांनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये संगनमत करुन गुंतवणुकदारांना शेअर मार्केट ट्रेडींगची माहिती देवून त्यांची दिशाभूल करीत सेमीनार घेतले. तसेच गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून २७९ गुंतवणुकदारांची फसवणुक करीत अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हा वर्ग होताच एजंटला केली अटक

गुंतवणुकदार भरत रतीलाल पवार (रा. पाळधी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी संशयित एजंट मिलींद पाटील याला अटक केली आहे.

संचालक पतीपत्नीला यापुर्वी दोन गुन्ह्यात अटक

पुण्यातील टीडबल्यूजे असो. प्रा. लि. या कंपनीच्या संचालकांविरुद्ध यवतमाळ येथील अवधुतवाडी पो. स्टे, रत्नागिरीतील चिपळून पो. स्टे, नवीमुंबईतील खारघर पो. स्टे, पुणे शहर येथील वारजे माळीवाडी पो. स्टे, ठाणे शहरातील श्रीनगर पो. स्टे, नागपुर शहरातील धंतोली पो. स्टे, रायगड येथील माणगांव पो. स्टे, छत्रपती संभाजी नगर एमआयडीसी सिडको पो. स्टे या आठ ठिकाणी त्यांच त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. यातील ठाणे येथील श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात कंपनीचे संचालक संशयित समीर सुभाष नार्वेकर व नेहा समीर नार्वेकर यांना दि. ३० जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. ते सद्या धंतोली पो. स्टे. मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCrimeFraud

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
Next Post

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नघरावर शोककळा : लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह चुलत भावाचा अपघाती मृत्यू !

April 11, 2024

‘जनतेचा आवाज दाबता येत नसतो’ : चंद्रकांत पाटील

October 3, 2021

‘खानदेशच्या लोकनाट्य तमाशा’ पुस्तक म्हणजे कलावंतांना प्रेरणा देणारे आणि सन्मान वाढवणारे : विनोद ढगे !

August 23, 2023

वंदेभारत अभियानांतर्गत १ लाख ३३ हजारांहून अधिक नागरिक मुंबईत दाखल !

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group