जळगाव (प्रतिनिधी) व्हॉट्सअॅप कॉल करून महिलेने एका ५७ वर्षीय वृद्धाचा नग्न व्हिडिओ शुट केला. त्यानंतर त्याला तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून १० हजार ५८० रुपयांची खंडणी उकळल्याची घटना भुसावळात घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळच्या एका भागात राहणार्या ५७ वर्षीय पीडित वृद्धाला २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एका अज्ञात महिलेने ८८७११५१५८२ या क्रमाकावरून वृद्धाच्या व्हॉट्सअॅपवर नंबरवर हाय मॅसेज पाठवला. त्यानंतर संबंधित महिलेने वृद्धाला व्हिडीओ कॉल करून आपले कपडे काढले आणि त्यानंतर वृद्धालाही कपडे काढण्यास सांगितले. वृद्धाने कपडे काढल्यानंतर तिने नकळत तो न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. दुसर्या दिवशी वृद्धाला त्यांचा न्यूड व्हिडीओ फेसबुक, युट्युबवर व्हायरल करण्याची धमकी देत १० हजार ५८० रुपयांची खंडणी मागितली. तसेच पैसे एनएफटीद्वारे आयडीएफसी खाते क्रमांक १००८७६२३३३०६ वर भरण्यास सांगितले. याप्रकरणी पिडीत वृद्धाच्या तक्रारीवरून ८८७११५१५८२ या क्रमाकाच्या अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.