TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारनियमनाची कोंडी फोडण्याचे महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न

‘सीजीपीएल’कडून ६३६ मेगावॅट वीज उपलब्ध ; कृषिपंपांना ८ तास वीज देण्याचे प्रयत्न सुरु

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उन्हाचा सुरूअसलेला प्रकोप व कोळसा टंचाईमुळे विजेच्या वाढत्या मागणीएवढी वीज उपलब्ध होत नसल्याने तात्पुरते व आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. तथापि भारनियमनाची ही कोंडी फोडण्यासाठी महावितरणकडून वेगाने सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. तसेच खुल्या बाजारातून वीज खरेदी करून गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीपासून राज्यातील कृषी वीजवाहिन्यांना ८ तास वीजपुरवठा देण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सोबतच इतर ग्राहकांसाठी सुरूअसलेले भारनियमन कमीत कमी राहील याची काळजी घेण्यात येत आहे.

दरम्यान, मागणीप्रमाणे वीजपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे राज्यात शुक्रवारी (दि. १५) सकाळपर्यंत कोणत्याही ठिकाणी भारनियमन करण्यात आले नाही. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीमधील निर्णयानुसार टाटा कंपनीच्या कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून (सीजीपीएल) महावितरणने वीजखरेदीची प्रक्रिया पूर्ण केली असून गेल्या तीन दिवसांपासून अतिरिक्त स्वरुपात ६३६ मेगावॅट वीज उपलब्ध झाल्यामुळे भारनियमनातून मोठा दिलासा मिळत आहे. यासोबतच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनकडून (एनटीपीसी) येत्या १५ जूनपर्यंत दररोज ६७३ मेगावॅट वीजपुरवठा सुरू राहणार आहे.

READ ALSO

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

महावितरणवर सर्व ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडून महावितरण वीज खरेदी करीत आहे. परंतु कोळसा टंचाई व इतर तांत्रिक कारणांमुळे या वीजनिर्मिती कंपन्यांकडून पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. महानिर्मितीकडून १५०० मेगावॅट वीज कमी मिळत आहे व मिळालेल्या माहितीनुसार महानिर्मितीच्या प्रकल्पांमध्ये केवळ चार दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. यासोबतच एनटीपीसीच्या सोलापूर व सीपत येथील वीजनिर्मिती प्रकल्पामधून जवळपास १२०० मेगावॅट वीज कमी मिळत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून उष्णतेच्या तडाख्याची लाट ४० ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावली आहे. त्यामुळे राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेच्या मागणी तब्बल ३००० ते ३५०० मेगावॅटने तर मुंबई वगळता महावितरणच्या उर्वरित कार्यक्षेत्रात ही मागणी सुमारे २००० ते २५०० मेगावॅटने वाढली आहे. महावितरणची सद्यस्थितीत २४५००-२५००० मेगावॅट अशी अभूतपूर्व मागणी आहे. परंतु वीज खरेदीचा करार केलेल्या कंपन्यांकडून कोळसा टंचाई व गॅसची कमतरता व इतर तांत्रिक कारणांमुळे वीज कमी मिळत असल्याने सुमारे २३०० ते २५०० मेगावॅट तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून अन्य स्रोतांकडून वीज खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्याची फलश्रृती म्हणून सीजीपीएल व एनटीपीसीकडून सद्यस्थितीत १३०९ मेगावॅट वीज अतिरिक्त स्वरुपात उपलब्ध होत आहे.

विजेचे भारनियमन टाळण्याचे आटोकाट प्रयत्न म्हणून महावितरणकडून खुल्या बाजारामधून (पॉवर एक्सचेंज) २००० मेगावॅटपर्यंत विजेची खरेदी करण्यात येत आहे. त्यातून कृषिपंपांना गुरुवारी (दि. १४) मध्यरात्रीनंतर ८ तास वीजपुरवठा करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या देशभरातून वीज खरेदीला मोठी मागणी असल्याने खुल्या बाजारातील वीजदर प्रतियुनिट १२ रुपयांवर गेले आहे. या दराने वीज खरेदीची तयारी असून देखील सध्या पुरेशी वीज उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. कोयनेतील वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू असून आणखी १० टीएमसी पाणीसाठा वापरण्यास विशेष मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भारनियमनाच्या संकटाची व्याप्ती कमी आहे. मात्र कोयनेतील पाणी वापराची जूनपर्यंतची मर्यादा लक्षात घेता वीजनिर्मितीवर मर्यादा आलेली आहे. अशा अभूतपूर्व वीज संकटाच्या स्थितीत शर्थीचे प्रयत्न सुरू असून शेतकऱ्यांना ८ तास वीजपुरवठा करण्यासोबतच इतर ग्राहकांसाठी विजेचे भारनियमन टाळण्याचे किंवा कमीत कमी करण्याचे महावितरणचे नियोजन सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

किळसवाणा प्रकार ! कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून केली मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मॉक ड्रील’मुळे रेल्वे प्रशासनाची उडाली धावपळ !

September 28, 2020

मी शिवसैनिकांना भीक घालत नाही : नारायण राणे

August 24, 2021

पुणे-जबलपूर उत्सव विशेष गाड्यांच्या फेर्‍या सुधारित संरचनेसह सुरू !

January 14, 2024

नागपूर : प्रेमी युगलाने सोबत घेतला टोकाचा निर्णय !

September 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group