जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात भुसावळ येथील चाँद सरवर तडवी उर्फ बेबो (वय २७) या तृतीयपंथीयाने यंदा न्यायालयानच्या निर्णयानुसार पोलिस भरतीसाठी तयारी करुन अर्ज भरला. धुळे जिल्ह्यात भरती प्रकीयेत भाग घेत तीने मैदानी चाचणी देत उत्तीर्ण होवून तीने मैदान मारले आहे. पोलिसाचा गणवेश घालणारी पहिली तृतीयपंथी ठरण्याची तीची इच्छा असल्याने लेखी परिक्षेची तयारीला चाँद लागली आहे.
सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांनाही समाविष्ट करून घ्यावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ही संधी हेरुन धुळे जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी चाँदने अर्ज भरला. प्रशिक्षण कसे घ्यावे या प्रश्नाचे उत्तर शोधत असतांनाच मैत्रिण दर्शना सोनवणे हिच्या माध्यमातून चाँदची अथॅलेक्टिक्सचे प्रशिक्षक इरफान शेख यांच्याशी भेट झाली. इरफान शेख यांनी तिला मैदानी चाचणीसाठी तयार केले. तर समाधान तायडे यांच्या योद्धा अकॅडमीत लेखी परीक्षेच्या अभ्यासासाठी तीला निशुल्क प्रवेश मिळाला.
मैदानी चाचणीसाठी धुळ्याला गेली. याठिकाणी मैदानावर गेल्यावर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी चाँदला प्रोत्साहीत केले चाँदची मैदानी चाचणी झाली. यात ५० पैकी ३५ गुण चांदला मिळालेत. पोलिस भरतीची लेखी परिक्षा आता २ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी चाँदचा कसून अभ्यास सुरू आहे. पोलीस होवून आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा निश्चिय चाँदने केला आहे.
आईच्या उपचारासाठी मागितला जोगवा
चाँदची आई आजारी असतांना तीने येलम्मा देवी डोक्यावर घेवून चाँद जोगवा मागीतला. हे करताना अनेक जण हिणवायचे. मात्र, सर्व संकटं आणि अडचणींवर मात करत आईसाठी चाँद जोगवा मागत राहिली. दिवसभरात मिळालेले पैसे आईच्या उपचारासाठी खर्च केले. अशाच पद्धतीने जोगवा मागवून चांद हिने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आठ ते दहा वर्षे उपचारानंतर चांदच्या आईचे २०२१ मध्ये निधन झाले. आईनंतर तीन भावंडांची जबाबदारी चाँद हिच्यावर आली. चाँद हीच तिच्या भावंडाची आई झाली. फर्दापूर येथील महाविद्यालयात ती वाणिज्य या विषयात तृतीय वर्षाला पदवीचे शिक्षण घेत आहे. तसेच आता पोलिस होण्याच्या उंबरठ्यावर चाँद आहे.














