नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांचा जामीन रद्द करण्यात आला असून एका आठवड्यात आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत.
लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होते.तेथे झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या हिंसाचाराची घटना समोर आल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा ही चारचाकी चालवत असल्याचं प्रथमदर्शनी उघडकीस आलं. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात मिश्रांना दणका बसला आहे.अलाहाबाद उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता. त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा ही चारचाकी चालवत असल्याचं प्रथमदर्शनी उघडकीस आलं. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात मिश्रांना दणका बसला आहे.