मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. बोनी कपूर यांना चार लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी आंबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात बोनी कपूर यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी बँकेकडे विचारणा केली असता त्यांना फसवणूक झाल्याची माहिती मिळाली. याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, बोनी कपूर यांच्याकडून कोणीही क्रेडिट कार्डची माहिती मागितली नसल्याचं देखील बोनी कपूर यांनी सांगितलं आहे. परंतु कार्ड वापरताना कोणीतरी डेटा मिळवला असल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. एवढंच नाही, तर 9 फेब्रुवारी रोजी सायबर फ्रॉडने पाच व्यवहार करून बोनी यांच्या खात्यातून 3 लाख 82 हजार रुपये ट्रान्सफर केले. बोनी कपूर यांच्या खात्यातील पैसे गुरुग्राममधील एका कंपनीच्या खात्यात गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.