मुंबई (वृत्तसंस्था) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आजही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागतेय. भारतीय तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये ०.३५ पैशांची वाढ झाली असून मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत ११२.११ पैसे इतकी आहे.
देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोल १०६.१९ रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर या दरवाढीनंतर डिझेलचे दर ९४.९२ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल ११२.११ रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेलही १०२.८९ रुपयांनी विकलं जात आहे. मुंबईत डिझेलच्या दरांमध्ये ०.३७ पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरांमध्ये ०.३४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.०१ रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल १०६.४३ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
देशातील प्रमुख महानगरांतील दर
देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली १०६.१९ ९४.९२
मुंबई ११२.११ १०२.८९
कोलकाता १०६.७७ ९८.०३
चेन्नई १०३.३१ ९९.२६
देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर १०० रुपयांच्या पार
देशातील २६ राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर १०० रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरच्या पार आहेत.
















