मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईत येऊन महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा केली. याच पार्श्वभूमीवर भाजप लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असून, या यादीत राज्यातील 15 ते 20 उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे भाजप राबविणार धक्कातंत्र राबविणार आहे. अनेक विद्यमान खासदारांचं तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा असून नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार आहे.
खालील जागांवरील उमेदवार बदलायची दाट शक्यता !
बीड
सोलापूर
सांगली
लातूर
जळगाव
उत्तर मुंबई
उत्तर मध्य मुंबई
नांदेड
अहमदनगर
धुळे
वर्धा
रावेर
खालील कारणांमुळे तिकिटे कापण्याची शक्यता…!
स्थानिक पातळीवरील राजकारण, विद्यमान खासदाराबाबत असलेली नाराजी, निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता, 3 पेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप, या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जात आहे. याबाबत चे वृत्त ‘एबीपी माझा’ने वृत्त दिले आहे.