मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. पाटणकरांशी संबंधित 84.6 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाने मंजूर केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. त्यामुळे ईडी ही मातोश्रीपर्यंत पोहोचली अशी चर्चा रंगली होती. पण, आता सत्तेतून पाय उतार होताच उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे पाटणकर यांना आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात क्लिन चीट देण्यात आली आहे. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर झाला असून यामध्ये श्रीधर पाटणकर यांच्या बाबतीत कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यांचा थेट सहभाग गैर व्यवहारात आढळले नाहीत, असं नमूद करण्यात आले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने एका निवेदनात म्हटले होते की त्यांनी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 निवासी सदनिका जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी केला होता. याप्रकरणी भाजपचे नेत किरीट सोमय्या यांनी जोरदार आवाज उठवला होता. त्यांनी उद्धव ठाकरे यांना याचा हिशोब द्यावा लागेल असे म्हटले होते. दरम्यान, ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ श्रीधर माधव पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आणि व्यवस्थापक आहेत.