बीड (वृत्तसंस्था) भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांच्या ताब्यात असलेल्या बीडच्या वैद्यानाथ बँकेला (Vaijnath Urban Co Operative Bank) आर्थिक गुन्हे शाखेकडून (Financial Offenses Branch notice ) कोट्यावधींच्या गैरव्यवहार प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, ३१ जानेवारीला कागदपत्रांसह हजर राहून खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.
लिलाव प्रक्रियेत अटी शर्थीचे उल्लंघन !
वैद्यनाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हावरगाव शंभू महादेव शुगर अलाइड इ.प्रा.लि. कारखाना तारण होता. त्यावर वैद्यनाथ बँकेसह इतर बँकांचा बोजा होता. शंभू महादेव कारखान्याने मुदतीत कर्ज रक्कम परत न केल्याने कारखाना लिलावात काढण्यात आला, मात्र लिलाव प्रक्रियेत अटी शर्थीचे उल्लंघन केले. अशी तक्रार पोलिसात करण्यात आली होती.
पोलिस अधीक्षकांकडून चौकशीचे आदेश !
शंभू महादेव कारखान्याच्या लिलावात अटी, शर्थीचे उल्लंघन केल्याचा बँकेवर आरोप असून पोलिसांच्या नोटीसमुळे खळबळ उडाली आहे. दी. वैद्यनाथ अर्बन को- ऑप बँकेचे सभासद सुभाष कारभारी निर्मळ यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात 5 जानेवारी चौकशी करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रकरण काय आहे?
वैद्यानाथ बँकेकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शंभूमाहादेव कारखाना गहाण होता. कारखान्याने वेळेत कर्ज परत न केल्याने कारखाना लिलावात काढण्यात आला. मात्र, या लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तींचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, पंकजा मुंडे या पक्षात नाराज असून त्या भाजपमधून (BJP) बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगलेय. ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत (Shivsena) येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळेच या नोटीसीनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
















