नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणाची विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.
लोकसभेच्या आधी पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्व आले आहे. या निवडणुकांच्या निकालावरुन देशातील जनतेचा कौल कुणाकडे आहे, हे देखील समोर येऊ शकणार आहे. थोडक्यात लोकसभेची सेमी फायनल म्हणून या निवडणुकीकडे बघितले जाता आहे.
दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम, तेलंगणा इथं एका टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात मतदान घेतले जाऊ शकते. मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या असल्या तरी सर्व राज्यांच्या निवडणुकीचे निकाल एकत्र करण्याबाबतही आयोग घोषणा करू शकते.