धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या गट नं. १२४८/२ मधील डोंगर पीर बाबा या वक्फ संस्थेच्या जागेचे संरक्षण करण्याबाबत वक्फ बोर्डाने आज जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
जाणून घ्या…नेमकं काय म्हटलंय पत्रात !
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर प्रकरणात उपलब्ध कागदपत्रावरन असे दिसुन येते की, रेन्ज फॉरेस्ट ऑफिसर एरंडोल (T) यांनी प्रमाणित केलेल्या नकाशावर गट नं. १२४८/१ मध्ये पीर देवस्थान असल्याची नोंद आढळुन येते. सोबत सदर वास्तु ही दर्गाची मिळकत असल्याचे प्रमाणीत होते. सोबत रेन्ज फॉरेस्ट ऑफिसर एरंडोल (T) यांनी प्रमाणीत केलेल्या नकाशाची प्रत जोडण्यात येत आहे.
दर्गा हजरत अहमद शाह कमाली शाह बाबा (डोगर पीर बाबा) ही दर्गा अतिक्रमणामध्ये मोडत असल्याने सदर अतिक्रमण निष्कासीत करणेबाबत आदेश पारीत झाल्याची तक्रार या कार्यालयास प्राप्त झाली आहे. प्रस्तुत प्रकरणी खालील बाबी नमुद करण्यात येत आहेत.
सदर मिळकत ही स्वातंत्र्या पुर्वीची असल्याबाबत संदर्भाधीन अर्जात नमुद केलेले आहे. जुना सर्वे नं. ६४२ धरणगांव, ता. धरणगांव, जि. जळगांवचे ७/१२ मध्ये पीराचे ठाणे व जुनी विहीर असल्याचे नमुद आहे. सदर विहीरीच्या दगडावर काही ठिकाणी सय्यद अहमद शाह कमाली १३ ऑगस्ट १९३७ अशी ऊर्दु मध्ये कोरीव काम केले आहे. सोबत त्याची छायाचित्र जोडण्यात येत आहे. त्याच प्रमाणे सदर दर्गाच्या मागील भागावर शिला कोरलेली असुन त्यावर सय्यद अहमद शाह कमाली हिजरी १८३६ अशी नोंद आहे.
सदर मिळकत ही स्वातंत्र्या पुर्वीची असल्याने केंद्रीय कायदा Place of Workship (Special Provision Act.) १९९१ चे कलम ४ व ७ अन्वये १५ ऑगस्ट १९४७ पुर्वीची धार्मिक स्थळे आबाधीत ठेवण्याचे तरतुद आहे. म्हणजेच या कायदयाचे तरतुदीनुसार १९४७ पुर्वीचे सर्व धार्मिक स्थळे अधिकृत आहे. त्यामुळे त्याचे जतन आणि व्यवस्थान होणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाने पारित केलेल्या वक्फ अधिनियम, १९९५ मधील कलम ३६ अन्वये विषयाधिन वक्फ संस्थेची नोंद या कार्यालयाकडे करण्यात आलेली असुन त्याचा नोंदणी क्र. MSBW/JGN/६७६ / २०२२ असा आहे. तसेच विषयाधिन वक्फ संस्थेची मालमत्ता सव्हे क्र. १२४८/२ मध्ये असल्याची नोंद या कार्यालयाकडे आहे. या संबंधीचे आवश्यक कागदपत्रे सोबत जोडण्यात आली आहेत.
प्रस्तुत प्रकरणी नमुद करण्यात येते की, वक्फ मंडळाकडे नोंदणी करण्यात आलेल्या मालमत्तेबाबत कोणताही आक्षेप असल्यास वक्फ अधिनियम, १९९५ मधील तरतुदी नुसार याबाबत महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे दाद मागणे आवश्यक आहे. वक्फ न्यायाधिकरण वा अन्य वरिष्ठ न्यायालया व्यतिरिक्त अन्य कोणासही वक्फ मालमत्तेबाबत निर्णय घेण्यास वक्फ अधिनियम, १९९५ अन्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
सबब, आपणांस विनंती करण्यात येते की, वक्फ अधिनियम, १९९५ च्या तरतुदीशी विसंगत कोणताही आदेश आपल्या कार्यालयाकडुन पारित झालेला असल्यास सदर आदेश रद्द करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच दर्गा हजरत अहमद शाह कमाली शाह बाबा (डोगर पीर बाबा ) या वक्फ संस्थेचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते निदेश संबंधितांना देण्यात यावे. प्रस्तुत प्रकरणी वक्फ मालमत्तेच्या मालकी हक्का विषयी कोणताही वाद असल्यास वक्फ अधिनियम, १९९५ मधील तरतुदीनुसार संबंधितांना महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे दाद मागण्यास सुचित करण्यात यावे.