नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एकाच टप्प्यात मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत. पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा कार्यक्रम आज जाहीर केला.
मध्य प्रदेश
एकूण जागा – २३०
मतदान तारीख – ७ नोव्हेंबर २०२३
राजस्थान
एकूण जागा – २००
मतदान तारीख – २३ नोव्हेंबर २०२३
छत्तीसगड
एकूण जागा – ९०
मतदान तारीख –
पहिला टप्पा – ७ नोव्हेंबर
दुसरा टप्पा – १७ नोव्हेंबर
तेलंगणा
एकूण जागा – ११९
मतदान तारीख – ३० नोव्हेंबर
मिझोराम
एकूण जागा – ४०
मतदान तारीख – ७ नोव्हेंबर २०२३
पाच राज्यांचा निकाल – 3 डिसेंबर रोजी