मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे हे आठवडाभरापासून रुग्णालयात असून त्यांच्यावर उपाचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बॉम्बे रूग्णालयात ते उपचार घेत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचेही रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एकनाथराव खडसेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावं लागल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे आणि त्यांचे कुटुंबीय सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथराव खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते.