धरणगाव (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहरातील गजानन पार्क परिसरात छापा टाकून बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त केला आहे. पथकाने यावेळी चार जणांना अटक केली पासून अकरा लाखाचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे
यासंदर्भात अधिक असे की, २२ जानेवारी रोजी कांतिलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म.रा.मुंबई, मा. संचालक उषा वर्मा राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, अर्जुन ओहोळ विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव सिमा झावरे, यांच्या नेतृत्वाखाली सी. एच. पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जळगाव, ए. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक, भरारी पथक, जळगांव, एस. एफ. ठेंगडे दु. निरीक्षक यावल, जवान एन. व्हि. पाटील, ए. व्ही. गावंडे, एम. डी. पाटील, के. पी. सोनवणे, राहुल सोनवणे यांनी भास्कर पांडुरंग मराठे याचे राहते घर, साई गजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे बनावट मद्य निर्मिती गुन्ह्याबाबत छापा टाकला. अशा चार संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली.
चार संशयित आरोपींना अटक
१) गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि. भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव
२) भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव
३) कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव
४) भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव
लाखोंचा मुद्देमाल जप्त
बनावट देशीमदय तयार करण्याकरीता लागणारे साहीत्य स्पीरीट, बनावट देशी दारु टँगो पंचच्या १८० मिली च्या सिलबंद बाटल्याचे ११७ बॉक्स (५६१६ बाटल्या), बनावट देशी दारु टँगो पंचच्या ९० मिली च्या सिलबंद बाटल्यांचे ८६ बॉक्स (८६०० बाटल्या), देशीमदयाचा तयार ब्लेंड, ४ सिलींग मशिन, १ ब्लेंडिंग मशिन, बुचे, रिकाम्या बाटल्या, खोके, कागदी लेबल तसेच दोन दुचाकी असा एकुण रु. ११,०२,४००/ रुपयाचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
हे करताय पुढील तपास
सदर गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती सिमा झावरे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली सी. एच. पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, जळगाव