धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र महाजन यांनी राजीनामा दिला आहे. यानिमित्ताने शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात अवघ्या दोन ओळीत राजेंद्र महाजन यांनी आपण स्व:खुशीने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दुसरीकडे आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, राजेंद्र महाजन हे शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जात होते. त्याच्या राजीनाम्यामुळे शिवसेंनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता राजेंद्र महाजन यांनी नंतर सविस्तर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.