TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातील तीन कुविख्यात गुन्हेगार स्थानबद्ध !

जिल्हा पोलीस दलाच्या कारवाईनंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2023
in अमळनेर, गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील तिन गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव येथील रामानंद नगर, भुसावळ बाजारपेठ आणि अमळनेर येथील तिघंविरुद्ध एमपीडीए कारवाईचा फास आवळला गेला आहे. विशाल भिका कोळी (कोळीवाडा पिंप्राळा जळगाव), हसनअली उर्फ आशु नियाजअली इराणी (रा. पापानगर झोपडपट्टी इराणी मोहल्ला भुसावळ) आणि विशाल दशरथ चौधरी (रा. भोईवाडा अमळनेर) अशी तिघांची नावे आहेत.

जळगावातील गुन्हेगाराविरोधात 11 गुन्हे !
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल कोळी यांच्या विरोधात दरोडा टाकणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जबर दुखापत, बेकायदेशीर मंडळी जमा करून अटकाव करणे, गावठी हातभट्टीची दारू विक्री करणे, सट्टा जुगार खेळणे असे वेगवेगळे एकूण 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी दोन वेळा हद्दपार करण्यात येऊन देखील त्याने हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण केल्याने रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अहवाल तयार करून जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठवला. त्यानुसार एम राजकुमार यांनी तो अहवालाचे अवलोकन करून अट्टल गुन्हेगार विशाल भिका कोळी याला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे.

READ ALSO

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

आरोपी नागपूरात स्थानबद्ध !
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, पोलीस नाईक राजेश चव्हाण, हवालदार विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलाल सिंग परदेशी, किरण पाटील यांनी संशयित आरोपीला नागपूर कारागृहात स्थानबद्ध केले.

अमळनेरातील गुन्हेगार येरवड्यात स्थानबद्ध !
अमळनेर शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत माजवणार्‍या विशाल दशरथ चौधरी (27) या गुन्हेगाराला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. 2023 या वर्षात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच एमपीडीएच्या कारवाई अमळनेरात झाल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी हा शहरातील विविध दंगलीत सहभागी होऊन दहशत निर्माण करत होता तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी लूट , तलवार घेऊन दहशत निर्माण करणे असे सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

भुसावळातील गुन्हेगाराविरुद्ध ११ गुन्हे !
भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील हसन अली उर्फ आशु नियाजाली इराणी याच्याविरुद्ध विविध कलमाखाली एकुण अकरा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

एमपीडीए प्रस्ताव तयार !
विशाल विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करूनदेखील त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता. यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हवालदार किशोर पाटील व सिद्धांत शिसोदे यांच्या मदतीने एमपीडीए प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. प्रस्तावाची मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी ,रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला 1 ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , हेकॉ. कैलास शिंदे , घनश्याम पवार , सुनील पाटील यांनी आरोपी विशाल चौधरी याला पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी नेले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
Next Post

थरारक : निवांत चालत आले, घरात घुसले आणि केला गोळीबार ; वृद्ध दाम्पत्य थोडक्यात बचावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवारांनी साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आदेश

April 23, 2021

जामनेरात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींना पाईपाचे फटके, दंडात्मक कारवाई मोहीम जोरात

February 24, 2021

राज्यातील बेरोजगारांना ५ हजार भत्ता द्या, एकनाथराव खडसे यांची अधिवेशनात मागणी !

August 23, 2022

पोलीस पाटलाचा निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group