चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील सत्रासेन गावाजवळ चारचाकीत शस्त्र खरेदी विक्री करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चोपडा तालुक्यातील सत्रासेन गावाजवळील फाट्याजवळ एम.एच.१९.१४३० क्रमाकांची चारचाकी गाडीत विना परवाना शस्त्र खरेदी करून विक्री करण्याच्या उद्देशाने येत होती. त्याच वेळी यातील दोन संशयित आरोपी छगन किसन कोळी (वय ७२) व ज्ञानेश्वर मोहन शिरसाठ नामक व्यक्ती या दोघांच्या ताब्यातून २५ हजार रुपये किमतीची गावठी बनावतीचा स्टीलचा पिस्टल रिकामे व ३ लाख रुपये किमत असलेली चारचाकी गाडी पोलिसांनी ताब्यात घेवून चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.शिवाजी बाविस्कर हे करीत आहेत.