जळगाव (प्रतिनिधी) दादावाडी परिसरातील रहिवासी सुभाष नवल पाटील (वय-५५) यांच्या मालकीची दुचाकी नवीन बसस्थानकावर लावून बाहेर गेले होते. परत आल्यावर दुचाकी आढळून आली नाही. यामुळे बसस्टॅण्ड येथून दुचाकी चोरीला गेली असून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुभाष पाटील यांनी गुरुवार (ता.२१) रेाजी दुचाकी (एमएच.१९.अेएल.६५२१) बसस्थानकावर लावून बाहेर गेले होते. परत आल्यावर दुचाकी आढळून आली नाही. शोधाशोध करुनही वाहन सापडत नाही म्हणुन त्यांनी आज जिल्हापेठ पेलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.