TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी मिळणार अर्धा तास अधिक वेळ ; जाणून घ्या..परीक्षेची संपूर्ण नियमावली !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2022
in राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन (Offilne) होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत, असं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मंडळाने आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली.

पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ

READ ALSO

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अतिरिक्त वेळ तर ७० गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे.

कोरोनाबाधित विद्यार्थ्यांसाठी सवलत

परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यास त्या विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत पुन्हा त्या विषयाचा पेपर देता येईल. जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते. तोंडी परीक्षाही दोन वेळेस देण्याची संधी असेल.

परीक्षार्थींना लसीकरण बंधनकारक नाही

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाचं बंधन नसेल. मात्र, पालकांनी पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करुन घ्यावे. राज्यात दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्याचे लसीकरण झाल्याची माहिती आहे.

परीक्षा केंद्र आणि व्यवस्था

परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त २५ विद्यार्थी एक सोडून एक या पद्धतीने बसवण्यात येतील. विद्यार्थ्याच्या जवळचे परीक्षा केंद्र देण्याची सोय करण्यात येईल. शाळेत अधिक विद्यार्थ्यी असल्याचं त्याच शाळेत परीक्षा केंद्र करण्यात येईल.

अशी आहे नियमावली

  • यावेळेस प्रॅक्टीकल आणि तोंडी परिक्षा देण्यासाठी दोन संधी असतील. पहिली संधी १४ फेब्रुवारी ३ मार्च दरम्यान असेल. या कालावधीत जे विद्यार्थ्यांकडून लेखी आणि तोंडी परिक्षा देऊ शकणार नाहीत त्यांना ३१ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान पुन्हा या परिक्षा देण्याची संधी.
  • दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रॅक्टीकल आणि तोंडी परीक्षा देण्याची दोन वेळेस संधी.
  • पहिली संधी २५ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान असेल.
  • यावर्षी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वाढीव वेळ मिळणार. ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याचा सराव कमी झाल्याने हा पेपर निर्णय.
  • जी प्रश्नपत्रिका ४० ते ६० गुणांची आहे. त्यासाठी १५ मिनिटे अतिरिक्त मिळणार तर ७० गुणांपेक्षा अधिक असलेल्या प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास अधिक मिळणार.
  • जे विद्यार्थी लेखी परीक्षेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असतील त्यांनाही जुलैच्या आसपास पुन्हा पुरवणी परीक्षा देण्याची संधी.
  • दुसऱ्यांदा परीक्षा द्यायची वेळ आल्यास नव्याने शुल्क भरावे लागणार नाही.
  • तोंडी परीक्षा दोन वेळेस देण्याची संधी देण्यात आल्याने निकालाच्या कालावधीवर कोणताही परिणाम होणार नाही.
  • परीक्षेनंतर ४० ते ४५ दिवसांमधे निकाल लावण्यात येणार.
  • जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा होऊ शकते.
  • परीक्षा देण्यासाठी परिक्षा हॉलमधे जास्तीत जास्त २५ विद्यार्थी असतील आणि ते झिग-झ्याग पद्धतीने बसतील.
  • परीक्षा केंद्र हे विद्यार्थ्यांच्या शाळेतच असेल. परीक्षा देण्यासाठी इतरत्र जावे लागणार नाही.
  • प्रॅक्टिकल परिक्षेसाठी बाहेरचे शिक्षक बहीस्थ परीक्षक म्हणून यावेळेस नसतील, तर त्याच शाळेतील शिक्षक अंत्यस्थ आणि बहीस्थ परीक्षक म्हणून काम करतील.
  • मुख्य परीक्षेसाठी परीक्षक त्याच महाविद्यालयातील असतील की बाहेरचे याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे.
  • दहावी आणि १२ वीच्या या परीक्षा एकूण अभ्यासक्रमाच्या ७५ टक्के अभ्यासक्रमावर घेण्यात येतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Rules#SSC_HSC_Exam

Related Posts

जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात संपन्न

October 13, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

देशात बेरोजगारी दरात घट ; महाराष्ट्रात बेरोजगारी दर ४.२ टक्के !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ८० जेष्ठ निराधार, दिव्याग, अंध नागरिकांना मिठाई वाटप

November 2, 2021

कृषि विधेयक व कामगार कायद्यांच्या निषेधार्थ अमळनेर काँग्रेसचे धरणे आंदोलन

October 3, 2020

ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून तरुणाची फसवणूक ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल !

October 22, 2022

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला ३० नोव्हेंबर रोजी प्रयोग !

November 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group