नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत यांचं निधन झालं आहे. भारतीय हवाई दलानं ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.
भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात CDS जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जणांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या 14 पैकी 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर एक पुरुष प्रवासी वाचला आहे. नीलगिरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितलं होतं.
डीएनए चाचणीच्या मदतीनं १३ मृतदेहांची ओळख पटवली जाणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर दुपारी पाऊणच्या सुमारास तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांच्याकडे चॉपरचं सारथ्य होतं.
बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी होते. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते.