धरणगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्री या तिन्ही महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी नगरपालिकेत काही वर्षापुर्वी विशेष सभेत ठराव मंजूर झाला. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नसून ते तात्काळ पुर्ण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन भाजप पक्षातर्फे देण्यात आले आहे. वेळेस काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्री या तिनही महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळा बसविन्यासाठी नगरपालिकेत काही वर्षापुर्वी विशेष सभेत ठराव झालेला असुन त्यासाठी त्याच वर्षी निधीची तरतुद नगरपरिषद अर्थसंकल्पात झालेली आहे,पंरतु अद्यापही ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही.तरी आपणास विनंती की सदर ठरावाची कार्यवाही कोणत्या स्तरावर त्यांची संपूर्ण माहीती कागदपत्रासह मिळावी तसेच वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करून तिनही महापुरुषांचे पूर्णाकृती स्मारक तात्काळ बसवावे ही विनंती तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टिच्या वतीने सनदशीर मार्गे आनंदोलनाचा पवित्रा स्वीकारण्यात येईल.निवेदन देते प्रसंगी भाजपाचे नेते शिरीषआप्पा बयस,अँड.संजय महाजन,पुनिलालआप्पा महाजन,अँड वसंतराव भोलाने,शहराध्यक्ष दिलीप महाजन,गटनेते कैलास माळी सर,नगरसेवक ललित येवले,भालचंद्र माळी,गुलाब मराठे,शरद भोई,कन्हैया रायपुरकर,विजय महाजन, विक्की महाजन, कृष्णा माळी, इत्यादी कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.