अमळनेर (प्रतिनिधी) पक्ष विस्तार व बळकटीसाठी नुकतंच भाजपाने विविध आघाड्यांवर अध्यक्ष जाहीर केले. यात शिक्षकांच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी शहर अध्यक्ष उमेश वाल्हे यांची तर शिक्षक आघाडी अध्यक्ष म्हणून चंद्रकांत कंखरे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा नेते आमदार गिरीश महाजन, उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, प्रदेश संयोजक व्ही.आर.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.