मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी आज (23 नोव्हेंबर) भाजपतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले होते.
वाढीव वीज बिलाविरोधात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरात भाजपकडून वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत भाजप हे आंदोलन करणार आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार सहभागी होणार आहे. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















