चोपडा (प्रतिनिधी) भाजप नेते रोहीतदादा निकम यांनी तालुक्यातील मौजे वेळोदे येथील गरीब भोई समाजाचे कुटुंबातील स्व. अमोलभाऊ यांच्या घरी जाऊन सात्वंतपर भेट घेतली. तसेच त्यांच्या आईवडीलांना आर्थिक मदतीचा हात म्हणून एक लाख रूपये मदत केली.
भोई समाजातील गरीब कुटुंबातील करता करविता शालेय विद्यार्थी वन विभागाची परिक्षा हाॅल तिकिट घेण्यासाठी जात असता काळाने झडप घातली. यात अमोलभाऊ आपल्यातून कायमचे निघुन गेले. स्व. अमोलभाऊ यांच्या परिवाराचे सात्वंन करण्यासाठी दुध संघ संचालक रोहीत दादा निकम, भाजपा तालुका अध्यक्ष पंकज पाटील, चोपडा विधानसभा निवडणूक प्रमुख गोविंद सैंदाणे,जैन प्रकोष्ट तालुकाध्यक्ष संजय जैन, चिटणीस भरत सोनगिरे,चंद्रशेखर पाटील यांनी आज भेट दिली होती.