मुंबई (वृत्तसंस्था) मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला काय उखडून घ्यायचे ते घ्या, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान दिले. भाजपकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असून त्यासाठी धमकावलं जात असल्याचा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला.
कर्ज प्रकरणी अंमलबजावणी संचनालयाने (ED) संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे. त्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर संजय राऊत यांनी भरगच्च पत्रकार परिषदेत व्यक्तीगत आणि पक्षाची याबाबतची भूमिका मांडली. “जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतात. राजकीय विरोधकांवर भडास काढण्यासाठी सीबीआय, ईडीचा वापर सुरु आहे. पण ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही,” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्याच्या चर्चेनंतर राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. इतकंच नाही तर सरकार टिकू देऊ नका असं सांगत भाजपचे काही नेते धमकावत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा त्यांना पोलीस, ईडी, सीबीआयसारख्या हत्यारं वापरावी लागतं. वर्षभरात शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक यांना नोटीस आली आहे. आता माझ्या नावाचाही गजर सुरु आहे. ईडीची नोटीस आमच्यासाठी मोठा विषय नाही. आम्ही ईडीला नोटीसला घाबरत नाही. आमच्यापैकी कोणी काहीही चुकीचं केलेलं नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं. घरातील महिलांना, कुटुंबीयांना लक्ष्य करणं ही नामर्दानगी आहे. या नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल. बायकांच्या पदाराआड खेळी तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
याविषयी राऊत म्हणाले की, “भाजपचे काही महत्त्वाचे लोक आणि त्यांचे हस्तक सातत्याने माझी भेट घेऊन हे सरकार टिकवू नका, हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी धमकवण्याचा प्रयत्न केला. पणी मी त्यांचा बाप आहे. त्यांनी अनेकांच्या नावाची यादी दाखवली. त्यांना केंद्रीय यंत्रणा ताब्यात घेऊन हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगण्यात आलं. तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला अटक करा पण या सरकार धक्काही लागू देणार नाही.”