जळगाव (प्रतिनिधी) भाजपा अल्पसंख्यक मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशची झुम ऑनलाइन बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. सदर बैठकीत भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे अध्यक्षस्थानी तर, भाजपा प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीया, आ.अतुल सावे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सदर बैठकीच्या सुरुवातीस कोरोना महामारीच्या काळात अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याबाबतचा कार्य अहवाल व आढावा सादर करण्यात आला. तसेच दि. ३० मे रोजी केंद्र सरकारला यशस्वी असे ७ वर्ष पुर्ण होत असल्याने अल्पसंख्याक मोर्चा च्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात हा दिवस सेवादीन म्हणून साजरा करण्यात येणार असून यात विविध धर्मस्थळावर मास्क, सॅनिटायझर, ऑक्सिमिटर, थर्मामिटर वाटप व गरजूंना किराणा वाटप करण्यात येणार आहे.अश्या विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीया, हाजी एजाज देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर बैठकीचे सूत्रसंचालन प्रदेश सरचिटणीस अतिख खान यांनी तर आभार जुनेद खान यांनी मानले.
सदर बैठकीस उत्तर महाराष्ट्र विभागातून प्रदेश उपाध्यक्ष अॅड. शहेबाज शेख (जळगाव),एजाज शेख (नंदुरबार), सलीम बागवान (अहमदनगर), प्रदेश कार्यकारणी सदस्य जाकीर पठाण (नंदुरबार) यांच्यासह भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश पदाधिकारी तसेच,अनेक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष मोठया संख्येने उपस्थित होते.