नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी क्रिकेटर आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. . ‘इसिस काश्मीर’कडून गंभीर यांना ठार मारण्यात येईल, असा धमकीचा मेल मंगळवारी मिळाला आहे.
गौतम गंभीर यांनी हा मेल मिळाल्यानंतर बुधवारी रात्री मध्य दिल्ली पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी गौतम गंभीर चर्चेत राहत असतात. नुकताच त्यांनी पंजाब काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांना निशाण्यावर घेतलं होतं. दरम्यान, पोलिसांकडून मेलची चौकशी सुरू करण्यात आलीय.