जळगाव (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्रात त्याच पद्धतीने प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना या आजाराने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलेले आहे. कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये दररोज अकराशे ते बाराशे रुग्णांची भर पडत असताना तसेच सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालयांमधील जागा अपुरी पडत असताना जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधी मात्र, चमकोगिरी करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे भाजप लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.
देवेंद्र मराठे म् यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्याला दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. दोन लोकसभा मतदारसंघातील जनतेने भाजपच्या लोकप्रतिनिधींना खासदार म्हणून निवडून दिले आहे. जळगाव जिल्ह्याचे दोन्ही खासदार कोरोना सारख्या या महामारीमध्ये कुठेही कधीही फिरतांना दिसलेले नाहीत. कोरोनाच्या या महामारीमध्ये कुठल्या खासदाराने जळगाव जिल्ह्याला मोठे जम्बो कॉवीड सेंटर उभारून दिले ..?, त्याच पद्धतीने कुठल्या खासदारांनी जळगाव जिल्ह्याला केंद्राकडून जास्तीत जास्त व्हेंटिलेटर मागून दिले..?, त्याच पद्धतीने खासदारांना वार्षिक पाच कोटी रुपयांचा इतका निधी असतो, परंतु आपल्या जिल्ह्याचे दुर्भाग्य इतकी दोघी खासदारांनी पाच कोटी रुपये निधी हा कुठे खर्च केलाय याचा सविस्तर तपशील जनतेसमोर ठेवावा..?, असे सवाल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेश पाटील यांचा विचार केला तर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये चर्चा आहे. खासदार उन्मेश पाटील जिल्हाधिकारी कार्यालय सोडले तर लोकसभा मतदारसंघात कुठेही दिसत नाही. खासदार उमेश पाटील यांनी काम करत असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यापेक्षा जर स्वतः कोवीड सेंटरला जाऊन तेथील रुग्णांची विचारपूस करून तेथील सुविधा कशा वाढवता येतील. या पद्धतीचे नियोजन करून केंद्राकडून जास्तीत जास्त निधी अथवा व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा पुरवठा जिल्ह्याला कसा करता येईल या पद्धतीचे नियोजन केले पाहिजे. सतरा लाख मतदारांनी एका मोठ्या अपेक्षेने खासदार निवडून दिलेला असतो, परंतु सध्याची परिस्थिती बघता खासदार दिसेनासे झाले आहे..! तसेच रावेर लोकसभा मतदार संघाचा विचार केला असता खासदार श्रीमती रक्षा खडसे ह्या दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. परंतु केवळ भुसावळ येथील रेल्वेचे डी आर एम ऑफिस व जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय सोडता ताई मात्र कुठेही फिरताना दिसत नाहीत. अशीही चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
ताई एक महिला भगिनी आहेत महिलांचा आम्हाला देखील आदर आहे. परंतु आमच्या पेक्षा जास्त अपेक्षा या रावेर लोकसभा मतदार संघातील आपणास निवडून दिलेल्या जनतेच्या आहेत. तसेच ताई राज्य सरकार वरती टीका करता परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याच ताई एखाद्यावेळेस भाजप पक्षावरती टीका करताना दिसल्यास आश्चर्य मानून घेऊ नये, अशीही चर्चा सध्या ताईंच्या प्रतिक्रियेनंतर सुरू आहे. परंतु असो राज्य सरकार वरती टीका करणे अतिशय सोपं असतं परंतु खासदार म्हणून आपण रावेर लोकसभेच्या जनतेसाठी किती जम्बो कोबिर सेंटर उभारले..? याचे उत्तर आपण द्यावे, तेथील जनतेच्या सुरु असलेल्या लाॅकडाऊनमधील रोजगारासाठी आपण खासदार म्हणून किती विशेष निधी मतदार संघासाठी व जिल्हा करता आणला..? याचा देशील तपशील आपण द्यावा. असेही मागणी त्यांनी केली आहे.
अधिकारी, आरोग्य यंत्रणा, राज्य सरकार हे टीका करण्याकरता अतिशय सोपं व्यासपीठ सध्या भाजप लोकप्रतिनिधींसाठी बनलेलं आहे. परंतु टीका करताना सर्वात पुढे होते ते म्हणजे आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोळे मामान विषयी काय बोलावं गेल्या दोन पंचवार्षिक पासून मामांनी खरंच जनतेला मामा बनवलं आहे का ..? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडलेला आहे.
शहरांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती असताना कोरोनाच्या या महामारीमध्ये खाजगी रुग्णालय फुल आहेत. कुठेही व्हेंटिलेटर उपलब्ध नाही अशा परिस्थितीमध्ये शहराच्या आमदारांनी रस्त्यावरती उतरून शहरातील जनतेसाठी योग्य अशी सुविधा निर्माण करून दिली पाहिजे. परंतु आमदार साहेब सध्या राज्य सरकार व मुख्यमंत्री महोदय यांच्या वरती टीका करण्यात व्यस्त आहे. परंतु आपले कर्तव्य सोडून इतरांवर टीकाटिपणी करण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. हे आमदार साहेबांना कधी कळेल. सुमारे चार लाख मतदारांनी आपल्या वरती विश्वास टाकून आपल्याला आमदार म्हणून निवडून दिले आहे. याची तरी जाण आमदार साहेबांनी ठेवावी.
शहरातील जनतेसाठी आमदार राजूमामा भोळे यांनी कुठलं कोवीड सेंटर उभारलं किती व्हेंटिलेटरची सुविधा आमदारांनी करून दिली..? याचे देखील उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. केवळ चमकोगिरी टीकाटिपणी करण्याची ही वेळ नाही आहे. राजकारण करण्यासाठी अख्खे आयुष्य पडलेला आहे. परंतु लोकांची आयुष्य उध्वस्त होत आहेत त्याची मात्र या भाजप लोकप्रतिनिधींना काहीएक पडलेली नाही. त्यामुळे किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी राजकारण बंद करून काम करत असलेल्या जिल्हा प्रशासनाला मदत होत असल्यास मदत करावी, किंवा घरामध्ये स्वतःला क्वारंटाईन करून ठेवावे.
राज्य सरकार केंद्र सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसल्यावर ही राज्यातील जनतेला कुठल्याही प्रकारे वाऱ्यावर सोडत नाही आहे व अतिशय स्वतःच्या कुटुंब या मधील सदस्य समजून मुख्यमंत्री महोदय देखील वेळोवेळी योग्य असं मार्गदर्शन करून महाराष्ट्रातील जनतेला धीर देत आहे व महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणा अतिशय चांगल्या प्रकारे ही परिस्थिती हाताळत नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याला कोरोना पासून मुक्त करतील. असे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे म्हणाले.